'या'साठी संपते शाओमीच्या फोनची बॅटरी

मुंबई: भारतात मोबाइल कंपन्यांमध्ये सध्या आघाडीवर आहे ती शाओमी कंपनी. शाओमीने आपले सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर यूजर्सच्या फोन बॅटरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. फोनची बॅटरी लवकर संपत असल्याची यूजर्सची तक्रर आहे. शाओमीच्या डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड आधारित MIUI 11 अपडेट मिळणाऱ्या डिव्हाइसमध्ये बॅटरी ड्रेनिंगची समस्या समोर आली आहे. यूजर्सने यावर विविध उपायही करून पाहिले आहेत. काहींनी कॅशे क्लिअर करणे, गुगल प्ले सर्व्हिस ऑफ करणे, ऑटोस्टार्ट अॅप्स टर्न ऑफ करणे असे उपाय सुचवले आणि करूनही पाहिले आहेत. एका यूजरने MIUI ऑप्टिमायजेशन ऑफ करण्याचाही सल्ला दिला. शाओमी ही समस्या लवकर सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. 'या' फोनचा चार्जर सुपरफास्ट स्मार्टफोन उत्पादक कंपन्या स्मार्टफोनमधील दोन गोष्टींवर सध्या सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यापैकी एक आहे फोनचा कॅमेरा तर दुसरं फिचर आहे ते म्हणजे फास्ट चार्जिंग. कंपनी वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह ग्राहकांना मोठी बॅटरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. यूजर्ससाठी बॅटरी दीर्घकाळ टिकणं खूप महत्वाचे असते, तसेच चार्ज करण्यासाठी फोनने कमीतकमी वेळ घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. या गोष्टी लक्षात घेऊन चिनी कंपनी ओप्पो जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वी कंपनीने या फोनशी संबंधित काही माहिती शेअर केली आहे. कंपनीने असे सांगितले की ओप्पो फाइंड एक्स 2 मध्ये ६५ डब्ल्यू सुपर VOOC फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान असेल. हे व्यावसायिकरित्या उपलब्ध जगातील सर्वात वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान आहे. अशाप्रकारे, हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह जगातील प्रथम स्मार्टफोन असेल जो 65 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह येईल. या अगोदर ओप्पोने Reno Ace स्मार्टफोन बाजारात आणला, ज्यामध्ये असेच चार्जिंग तंत्रज्ञान होते. 4,000mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. असे असू शकतात फीचर्स यात 2K रिझोल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटवाल एमोलेड डिस्प्ले असू शकेल. ड्युअल मोड 5 जी सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये 4,000mAh पेक्षा मोठी बॅटरी मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. 48 मेगापिक्सेलशिवाय, यात 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर असेल ज्यामध्ये 5 एक्स हायब्रीड ऑप्टिकल झूम देण्यात येईल. तेथे वाइड-अँगल लेन्स देखील असतील. फ्रंटवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 6.5 इंचाची स्क्रीन असण्याची शक्यता आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GzSUOm

Comments

clue frame