मस्तच! 'येथे' आयफोन मिळणार ४० हजारांपर्यंत स्वस्त

नवी दिल्ली: जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मस्त ऑफर आहे. च्या रिपब्लिक डे सेलमध्ये आयफोनवर ४० हजार रुपयांपर्यंत बंपर सूट मिळणार आहे. ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल १९ जानेवारीला सुरू होणार आहे. हा सेल २२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये Apple iPhone XS वर ४०,००० रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहे. हा फोन ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य आयफोनवरही भरपूर सवलती आहेत. आता आहे ८९,९९९ रुपये किंमत सेलमध्ये वर सवलत मिळाल्यानंतर याचे ६४जीबी स्टोरेज मॉडेल ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ८९,९९९ रुपयांच्या प्राइस टॅगसह लिस्टेड आहे. हा सेल १९ जानेवारीला रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. प्लस कस्टमर्स हा सेल चार तासांपूर्वीच अॅक्सेस करू शकतात. आयफोन ११ आणि आयफोन ११ प्रोवर डिस्काउंट Apple iPhone 11 आणि iPhone 11 Pro वरही ६,००० रुपये डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर केवळ HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यूजरसाठीच आहे. हे आयफोनही स्वस्त आयफोन ७ प्लस ३३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. iPhone 7 या सेल मध्ये २४,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन ४,१६७ रु. प्रति महिना नो कॉस्ट ईएमआयवर मिळणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट प्रत्येक तासाला नव्या ऑफर देणार आहे. ICICI, कोटक महिंद्रा सारख्या बँकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीवरही डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही ८० टक्क्यांपर्यंत सवलत आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2G0ph8Q

Comments

clue frame