नवी दिल्लीः ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आकर्षक प्लान आणले आहेत. ऑनलाइन कॉन्टेंट आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्ससाठी आता ग्राहकांना जास्त डेटा देणारे प्लान पसंत पडत आहेत. परंतु, यात काही ग्राहकांना डेटाऐवजी जास्त कॉलिंग देणारे प्लान आवडत आहेत. या ग्राहकांसाठी एअरटेलने काही खास प्लान आणले आहेत. जर ग्राहक ड्युअल सिम फोनमध्ये एक डेटासाठी व एक कॉलिंगसाठी वापर करीत असेल तर एअरटेलचे काही प्लान खूपच चांगले आहेत. एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान खूपच चांगला आहे. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. तसेच २ जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ग्राहकांना भारती एएक्सएकडून २ लाखांचा विमा कवच दिले जाते. एकूण ३०० फ्री एसएमएस ऑफर ग्राहकांना मिळणाऱ्या कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फायदा पाहिला तर ग्राहकांना म्युझिक आणि एक्सट्रिम अॅपचा फ्री अॅक्सेस दिला जातो. एअरटेलचा दुसरा प्लान ३७९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. एकूण ६ जीबी डेटा ऑफर केली जाते. या प्लानमध्ये देशभर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या ऑफरमध्ये फास्टॅग खरेदी केल्यानंतर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. दररोज १०० फ्री एसएमएस ग्राहकांना दिला जातो. तसेच एअरटेल एक्सट्रीम प्रीमियमचा फ्री सब्सक्रिप्शन ग्राहकांना मिळतो. एअरटेलचा १ हजार ४९८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि ३६५ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा ऑफर ग्राहकांना मिळतो. या प्लानसोबत ग्राहकांना विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रिम अॅप प्रीमियमचे सब्सक्रिप्शन दिला जातो. तसेच फास्टॅगच्या खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GmNx5d
Comments
Post a Comment