वोडाफोनचे प्रीपेड ग्राहकांसाठी दोन प्लान लाँच

मुंबई: वोडाफोनने भारतात आपल्या ग्राहकांसाठी दोन प्लान लाँच केले आहेत. वोडाफोनने ५५८ रुपये व ३९८ रुपयांच्या प्लान उपलब्ध केले आहेत. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. या प्लानची वैधता अनुक्रमे ५६ दिवस आणि २८ दिवस आहे. त्याशिवाय वोडाफोनने आपल्या १९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले असल्याचे समजते. वोडाफोनच्या ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर आहे. त्याशिवाय दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. त्याशिवाय प्रतिदिवस १०० मेसेज ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय कंपनीच्या या प्लानमध्ये ४९९ रुपये किंमतीच्या वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि ९९९ रुपये किंमत असलेल्या ZEE5 ची सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. वोडाफोनचा दुसरा ३९८ रुपयांचा प्लान डेटाबाबत ५५८ रुपयांच्या प्लानसारखा आहे. मात्र, त्याची वैधता कमी दिवसांची आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. त्याशिवाय प्रतिदिवस १०० एसएमएस ग्राहकांना मिळणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही ग्राहकांना मिळणार आहे. वोडाफोनचा ५५८ रुपयांचा प्लान हा फक्त मध्य प्रदेश सर्कल पुरता मर्यादित आहे. तर, ३९८ रुपयांचा प्लान हा मध्य प्रदेश आणि मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहे. मुंबई सर्कलमध्ये ३९८ रुपयांच्या प्लानची वैधता वेबसाइटवर ५६ दिवसांची दाखवण्यात येत आहे. वोडाफोनने आपल्या १९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या प्लानमध्ये याआधी १५० एमबी डेटा मिळत होता. या डेटामध्ये वाढ करण्यात आली असून आता २०० एमबी डेटा मिळणार आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह या प्लानची वैधता दोन दिवसांची असणार आहे. वोडाफोनचा हा बदल झालेला प्लान मुंबई, मध्य प्रदेश आणि हरयाणा सर्कलमध्ये उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30MUN3M

Comments

clue frame