व्होडाफोनचा धमाका; हजार रुपयांत सहा महिने फुकट बोला

नवी दिल्ली: इतर दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी व्होडाफोनने कंबर कसली असून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. व्होडाफोन कंपनी ग्राहकांसाठी ९९७ रुपयांचा प्रिपेड प्लान घेऊन आली आहे. या प्लाननुसार ग्राहकांना ९९७ रुपयांत सहा महिने टॉक टाइम मोफत मिळणार असून दररोज १.५ जीबीचा डेटाही मिळणार आहे. म्हणजे ग्राहकांना १८० दिवसांत एकूण २७०जीबी डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या या ९९७ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना १८० दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. हा प्लान घेतल्यानंतर व्होडाफोनचे यूजर्स कोणत्याही नेटवर्कच्या नंबरवरून फ्रि कॉल करू शकणार आहेत. शिवाय या प्लानमध्ये दिवसाला १०० एसएमएसही फ्रि देण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याला फोन रिचार्ज करणाऱ्यांसाठी हा प्लान सर्वात सोयीचा पडणार आहे. व्होडाफोनने काही दिवसांपूर्वीच ९९ आणि ५५५ रुपयाचा प्रिपेड रिचार्ज प्लान आणला होता. त्यानंतर हा प्लान आणला असून कंपनीच्या आधीच्या ५९९ रुपयेवाल्या प्लानचं हे नेक्सट व्हर्जन मानलं जातं. ५९९च्या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ ८४ दिवसांचीच व्हॅलिडिटी मिळत होती. त्यात आता ९६ दिवसांची भर टाकण्यात आली आहे. नव्या ९९७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबीचा डेटा मिळणार आहे. सध्या तरी व्होडाफोनचा हा प्लान काही सर्कलमध्येच देण्यात आला असून लवकरच सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये हा प्लान देण्यात येणार आहे. यापूर्वीही कंपनीने १४९९ रुपयांचा प्लान आणला होता. त्यात अत्यंत कमी डेटा देण्यात आला होता. मात्र त्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची म्हणजे ३६५ दिवसांची होती. त्यात यूजर्सला एकूण २४ जीबी डेटा मिळत होता. म्हणजे यूजर्सला महिन्याला केवळ २जीबी डेटा मिळत होता. त्या तुलनेत नव्या ९९७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी डेटा मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2txEkUP

Comments

clue frame