रिलायन्स जिओ बनली देशातील 'नंबर वन' कंपनी

नवी दिल्लीः अवघ्या तीन वर्षात कंपनी दिग्गज कंपन्यांना मागे टाकत 'नंबर वन' बनली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने नोव्हेंबर २०१९ साठी जाहीर केलेल्या आकडेवारीत जिओने एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाला मागे टाकले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये रिलायन्स जिओचे मार्केट शेअर ३२.४० टक्के इतके होते. तर भारती एअरटेलची भागीदारी २८.३५ टक्के आणि व्होडाफोन आयडियाची केवळ २९.१२ टक्के इतकी भागीदारी होती. नोव्हेंबर मध्ये व्होडाफोनची ऑक्टोबरच्या तुलनेत ३.६४ कोटी वायरलेस ग्राहक कमी झाले. त्यामुळे मार्केट शेअरमध्ये ९.७ टक्क्याचे नुकसान सोसावे लागले. दुसरीकडे भारती एअरटेलने वायरलाइन कॅटेगिरीत ७,७९३ नवीन ग्राहक जोडले आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये कंपनीला ८८३० कोटी ग्राहकांचे नुकसान सहन करावे लागले. वायरलेस कॅटेगरीत कंपनीला १६ लाख नवीन ग्राहक जोडता आले. रिलायन्स जिओने नोव्हेंबर महिन्यात ५६ लाख वायरलेस कॅटेगरीत नवीन ग्राहक जोडले. वायरलाइन कॅटेगरीत कंपनीची भागीदारी ५६.०७ टक्क्यांहून अधिक आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी एकूण संख्या ११७ कोटी होती. या दरम्यान एकूण ४८.८ लाख मोबाइल नंबर पोर्टिबिलिटीसाठी अर्ज आले आहेत. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन महिन्यात जिओची जबरदस्त चांदी झाली आहे. या दरम्यान ६९,८३,१४६ लोक जिओसोबत जोडले गेले आहेत. ततर २३,८४६१० लोकांनी एअरटेलची सोबत सोडली आहे. यात २५,७६,७२६ लोकांनी व्होडाफोनला सोडले आहे. विशेष म्हणजे, यात लोकांनी बीएसएनएलवर विश्वास कायम दाखवला आहे. दोन महिन्यात ७३,७,९२८ लोक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. ट्रायच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सप्टेंबर महिन्यात एकूण मोबाइल ग्राहक ७.५४ कोटी झाले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या ७.५२ कोटी रुपये होती. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एकूण १.६८ लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले गेले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगमध्ये भारती एअरटेलचे ऑगस्टमध्ये १.४९ कोटी सब्सक्राइबर होते. जे सप्टेंबरमध्ये कमी होऊन १.४८ कोटी झाले.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NyykSr

Comments

clue frame