ओप्पो आणणार जगातला सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन

नवी दिल्ली : सध्या बाजारात येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यासोबतच बॅटरीवरही ग्राहक जास्त भर देतात. त्यामुळेच कंपन्याही दमदार बॅटरी क्षमतेचे फोन आणण्यावर भर देत आहेत. बॅटरी जास्त काळ टिकणारी असावी यासोबतच ती लवकर चार्ज व्हावी ही देखील ग्राहकांची गरज असते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेत जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन आणणार आहे. आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाँच होऊ शकतो. लाँचिंगपूर्वी कंपनीने या फोनची काही माहिती शेअर केली आहे. या फोनमध्ये ६५ W सुपर VOOC फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान असेल, असं कंपनीने सांगितलं आहे. व्यावसायिक रुपात मिळणारी ही जगातील पहिलीच सर्वात वेगवान चार्जिंग असेल. त्यामुळे हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरचा जगातला पहिला फोन असेल ज्यात ६५W फीचर असेल. यापूर्वी ओप्पोनेच रेनो एस (Reno Ace) हा स्मार्टफोन लाँच केला होता, ज्यात या प्रकारची फास्ट चार्जिंग सुविधा होती. ४०००mAh बॅटरी क्षमतेचा हा स्मार्टफोन ३० मिनिटात फुल चार्ज होतो. या फोनमध्ये २K रिझोल्युशन आणि १२०Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. ड्युअल मोड ५G, ४०००mAh क्षमतेची बॅटरी यासह ४८ मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. ४८ मेगापिक्सेल सेटअपसह १३ मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर असेल, जे ५x हायब्रिड ऑप्टिकल झूम सुविधा देईल. यासोबच वाइड अँगल लेन्सही असेल. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aNA2JT

Comments

clue frame