यूट्यूब व्हिडिओसाठी गुगल क्रोमचे खास फीचर

नवी दिल्लीः गुगलच्या कोट्यवधी युजर्संना चांगला अनुभव घेता यावा यासाठी गुगलने आपल्या फीचर्समओध्ये अनेक बदल केले आहेत. गुगलचा क्रोम बाउजरसाठी सर्वसाधारणपणे ब्राउजिंकचा वापर केला जातो. परंतु, आता ग्राहकांना क्रोम एक्स्पेरियन्स आणखी चांगला बनवता येऊ शकतो. या नवीन बदलामुळे ग्राहकांना आता वारंवार टॅब बंद न करता यूट्यूबचा व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येऊ शकणार आहे. क्रोमचा पिक्चर इन पिक्चर मोड यूट्यूब व्हिडिओला एक छोटी स्क्रीन मध्ये रुपांतरित करतो. त्यामुळे तुम्ही त्या टॅबला मिनिमाइज करू शकतात. यावर तुम्ही काम करू शकता. याचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे, तुम्ही आपला कम्प्युटरला स्क्रीनवर आपल्या गरजेनुसार मूव्ह करू शकतात. या मोडला ऑन करण्यासाठी यूट्यूबवर त्या व्हिडिओला प्ले केल्यास व्हिडिओ सुरू होणार आहे. त्यात पिक्चर इन पिक्चर मोडमध्ये पाहू शकतात. व्हिडिओ प्ले झाल्यानंतर स्क्रीनवर दोन वेळा उजव्या बाजुला क्लिक करा. दुसऱ्यांदा क्लिक केल्यानंतर हा मोड दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ पीआयपी मोडमध्ये दिसेल. हे फीचर केवळ यूट्यूबवर आहे. पीआयपी मोडमध्ये तुम्हाला व्हिडिओ संबंधीत जास्त कंट्रोल करण्याची गरज नाही. यात केवळ पॉज आणि बॅक टू फुल स्क्रीन असे दोन पर्याय आहेत. काही युजर्सना या ठिकाणी व्हिडिओ फॉरवर्ड, आवाज, किंवा व्हिडिओ रिप्ले यासारख्या फीचर्सची कमी जाणवू शकते.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aM4PX8

Comments

clue frame