नवी दिल्लीः व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालं आहे. भारतासह जगभरात टिकटॉकचे युजर्स मोठ्या संख्येनं वाढत आहे. टिकटॉकची हीच लोकप्रियता पाहता गुगलनं व्हिडिओ मेकिंग अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपचं नाव गुगल टँगी असं असून हे अॅप गुगलच्या एरिया १२० टीमनं तैयार केलं आहे. टँगी हे सोशल मीडिया शेअरिंग अॅप असून यावर How To (म्हणजेच एखादे अवघड कामं कसं सोपे करता येईल याची माहिती) व्हिडिओ शेअर करता येणार आहे, जेणेकरून लोकं या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकू शकतात. काय आहे गुगल टँगी अॅप टिकटॉक प्रमाणेच या अॅपवर ६० सेंकदपर्यंत व्हिडिओ बनवता येणार आहेत. टिकटॉक अॅपचा वापर एंटरटेनमेंटसाठी जास्त केला जातो. मात्र, गुगलचे हे अॅप शैक्षणिक वापरासाठी केला जाणार आहे. याच DIY, लाइफस्टाइल, आर्ट, फॅशन आणि ब्यूटी यांसारख्या वेगवेगळ्या कॅटेगिरी देण्यात आल्या आहेत. सध्यातरी हे अॅप अॅपल प्ले स्टोअर आणि वेबवर फ्री डाउलोडिंगसाठी उपलब्ध आहे. युरोपियन युनिअनसोडून जगभरातील उपलब्ध आहे. मात्र, अद्याप हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर आलं नाहीये. अँड्रॉइड युजर्ससाठी हे अॅप कधी उपलब्ध होणार आहे याबाबत कोणतीही माहिती सांगण्यात आली नाहीये. सध्या काही लोकांचं या अॅपवर व्हिडिओ बनवू शकतात. यासाठी त्यांना आधी वेटलिस्ट जॉइन करावी लागणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aUB1rx
Comments
Post a Comment