व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट लॉक 'असं' अॅक्टिव्हेट करा

नवी दिल्ली: जगभरात व्हॉट्सअॅप लोकप्रिय आहे. जगभरातील १.५ अब्ज यूजर व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप यूजरच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचमुळं व्हॉट्सअॅपमध्ये एंड-टू-एंड इनक्रिप्शन आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन आदी फीचर दिले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीनं सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट लॉक हे आणखी एक फीचर दिलं. या फीचरच्या मदतीनं यूजर आपल्या फिंगरप्रिंटनं व्हॉट्सअॅप अनलॉकही करू शकतात. हे फीचर ऑन करायची यूजरची इच्छा असेल तर... अँड्रॉइड आणि आयओएसवर देण्यात आला आहे. या फीचरचा वापर कसा कराल? तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट लॉक कसा अॅक्टिव्ह कराल? अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट लॉक अॅक्टिव्हेट करा (हे फीचर फिंगरप्रिंट सेंसर आणि ६.०हून अधिकच्या अँड्रॉइड व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनमध्ये आहे.) स्टेप १ - आपल्या फोनमधील व्हॉट्सअॅप ओपन करा. स्टेप २ - सेटिंग्जमध्ये जाण्यासाठी तीन डॉट्स मेनूवर टॅप करा स्टेप ३ - अकाउंटमध्ये जा आणि त्यानंतर प्रायव्हसीवर क्लिक करा. स्टेप ४ - फीचर ऑन करा स्टेप ५ - अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला फिंगरप्रिंट व्हेरिफाय करावा लागेल iOS स्मार्टफोनमध्ये असा वापरा व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट लॉक (याची प्रक्रिया अँड्रॉइडसारखी आहे. नव्या आयफोनमध्ये टच आयडीऐवजी फेस आयडीचा पर्याय उपलब्ध आहे.) स्टेप १ - आपल्या फोनमधील व्हॉट्सअॅप सुरू करा. स्टेप २ - सेटिंग्जमध्ये जा. अकाउंटवर गेल्यानंतर प्रायव्हसीमध्ये जा. स्टेप ३ - खालील बाजूस असलेल्या स्क्रीन लॉकवर टॅप करा आणि फीचर लॉक ऑन करा. स्टेप ४ - अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला फिंगरप्रिंट व्हेरिफाय करावा लागेल


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36TaeJV

Comments

clue frame