नवी दिल्लीः शाओमीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. कंपनीने आपल्या आणि Redmi K20 आणि वर दोन हजारांचा फ्लॅट डिस्काउंट दिला आहे. म्हणजेच या दोन हजारांच्या डिस्काउंटनंतर रेडमी के२० या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर रेडमी के २० प्रोची किंमत २२ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. शाओमीच्या या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ती कमी झाली आहे. तसेच रेडमी के२० प्रो या फोनची किंमत आता २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर २२ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. शाओमीचा सध्या सेल सुरू असून एसबीआय क्रेडिट कार्डवर ही ऑफर सुरू आहे. ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह mi.com वर खरेदी करता येऊ शकणार आहे. शाओमीची ही मर्यादित ऑफर आहे. १७ जानेवारी नंतर ही ऑफर बंद केली जाणार आहे. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी एक ट्विटरवर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, ब्लॉकबस्टर रेडमी के२० सीरीज १७ जानेवारीपर्यंत २ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट सह उपलब्ध आहे... तुम्ही mi.com , फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेट्समध्ये एसबीआय कार्ड्सवर ईएमआयचा वापर करून या ऑफरचा फायदा घेऊ शकता, असे म्हटले आहे. शाओमीच्या रेडमी के२० आणि रेडमी के२० प्रो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ ची कोटिंग दिली आहे. शाओमीचा रेडमी के२० प्रो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. तर रेडमी के २० स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. अँड्रॉयड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित MIUI 10 वर हा फोन चालतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये फ्रंटमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच बॅकमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस १३ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35N8L6x
Comments
Post a Comment