मस्तच! आता नोकियाचाही फोल्डेबल मोबाइल

नवी दिल्ली: फोल्डेबल डिस्प्ले टेक्नॉलॉजी विकसित झाल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेला फोल्डेबल स्मार्टफोन्सचा ट्रेंड २०२० ला देखील सुरूच आहे. सॅमसंग, मोटोरोला आणि हुवावेनंतर एचएमडी ओनरशीपचा ब्रँड असणाऱ्या नोकियादेखील फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. लवकरच नोकियाचा फोल्डेबल येणार आहे. नोकियाव्यतिरिक्त चीनचा टेक ब्रँड शाओमीदेखील दोन वेळा फोल्ड होणाऱ्या डिव्हाइसवर काम करत आहे. Nokiamob च्या एका रिपोर्टनुसार, नोकियाचे हँडसेट बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. हा हँडसेट Moto Razr सारख्याच क्लॅमशेल डिझाइनसह लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टमध्ये म्हटलंय की हा स्मार्टफोन २०२० च्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये किंवा मग २०२१ च्या सुरुवातीला येऊ शकतो. सध्या याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. 9.2 ही होणार लाँच फोल्डेबल फोनशिवाय एचएमडी ग्लोबल Nokia 9 PureView चे सक्सेसर Nokia 9.2 वरही काम करत आहेत. Nokia 9.2 याच महिन्याच्या सुरुवातीला समोर आला आहे. हा फोन २०२० च्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. Nokia 9.2 Pure View नावाच्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट मिळणार आहे, यामुळेच यूजर्सना या डिव्हाइसची खूप वाट पाहावी लागणार आहे. 5G कनेक्टिव्हिटी नोकियाचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणार आहे. यासाठी क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेटमध्ये इंटिग्रेटेड X55 5G मॉडेम दिला जाणार आहे. याचा कॅमेरा सेटअपही चांगला आहे. मूळ Nokia 9 Pureview मध्ये पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप फोनच्या रिअर पॅनेल वर दिला गेला होता. नव्या डिव्हाइसमध्ये पेंटा लेंस सेटअपचं अपग्रेड दिसण्याची शक्यता आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Xys3h

Comments

clue frame