एअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद

नवी दिल्लीः एअरटेलने नवीन वर्षात आपला फोकस ४ जी सेवेवर केला आहे. त्यामुळे कंपनीने देशातील १० राज्यातील ३ जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलने सर्वात आधी कोलकातामध्ये ३ जी सेवा बंद केली होती. ३ जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एअरटेलने ९०० मेगाहर्ट्ज बँड स्पेक्ट्रम आता ४ जी नेटवर्कमध्ये रुपांतरीत केले आहे. कोलकातानंतर महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, पंजाब, कोलकाता, हरियाणा आणि गुजरात मध्ये ३ जी सेवा बंद करण्यात आली आहे. ज्या परिसरात ३ जी सेवा बंद करण्यात आली आहे. त्या परिसरातील ग्राहकांना कंपनीने आधिच सूचना केली आहे. ज्या ग्राहकांनी हँडसेट किंवा सीम अपग्रेड केले नाही. त्या ग्राहकांना व्हाईस सेवा मिळत राहणार आहे, असे एअरटेलने म्हटले आहे. मार्च २०२० पर्यंत देशातील एअरटेलची सेवा पूर्णपणे बंद होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. फीचर फोनच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीसाठी २ जी सेवा देण्यात येणार आहे. कंपनीने २३०० मेगाहर्ट्ज आणि १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये आपली ४ जी सेवा कम्प्लिट करण्यासाठी ९०० मेगाहर्ट्ज बँडची अत्याधुनिक एल ९०० टॉवर तैनात करण्याची तयारी केली जात आहे. एल९०० सह एअरटेल स्मार्टफोन ग्राहकांना आता इमारती, घरे, कार्यालये आणि मॉलच्या आत चांगली ४ जी सेवा उपलब्ध होणार आहे.



from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RdmgZg

Comments

clue frame