विवोचा स्वस्तातला मस्त Y11 फोन भारतात लाँच

नवी दिल्लीः विवोने आपला वाय सीरिजचा नवीन Y11 भारतात लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या फोनच्या बॅटरी बॅकअपसाठी ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत सर्वांना परवडेल अशी आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरी दिली असून याची किंमत केवळ ८ हजार ९९० रुपये इतकी आहे. विवोचा हा फोन मिनरल ब्लू, अॅगेट रेड रंगात उपलब्ध आहे. विवो वाय ११ (Y11) स्मार्टफोन २४ डिसेंबरपासून सर्व ऑफलाइन चॅनेल्स आणि विवो इंडिया ई-स्टोर मध्ये उपलब्ध झाला आहे. हा फोन अॅमेझॉन, पेटीएम मॉल, टाटा क्लिक आणि बजाज ईएमआय ई-स्टोरमध्ये २५ डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर फ्लिपकार्टवर विवोचा फोन २८ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर हा फोन ऑफलाइन एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून ईएमआय आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून ईएमआयवर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. जर हा फोन ऑनलाइन खरेदी केल्यास ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय मिळणार आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस हलो फुलव्ह्यू डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन १२ एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीचा स्टोरेज आहे. या फोनमध्ये ४३९ स्नॅपड्रॅगन, अँड्रॉयड, तसेच फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये पाठीमागे १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35T3YRX

Comments

clue frame