Xiaomi चे बनावट प्रोडक्ट कसे ओळखाल?

मुंबई: सध्या गॅजेट्स आणि मोबाइलच्या बाजारात दबदबा असलेली एक कंपनी म्हणजे शाओमी ( ). शाओमीचे अनेक प्रोडक्ट्स सध्या उपलब्ध असून ग्राहकांची देखील त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळं याचा फायदा घेऊन ग्राहकांना फसवण्यात येत आहे. बाजारात असलेल्या या ब्रॅन्डच्या बनावट म्हणजेच ड्युप्लिकेट प्रोडक्ट्समुळं ग्राहकांची फसवणूक होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात कंपनीकडून दिल्लीतील पोलिसठाण्यात कंपनीचे तयार केले जात असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळं तुम्ही जर शाओमीचे गॅजेट्स खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्यामुळं तुमची फसवणूक होणार नाही. तुम्हाला ओरिजन आणि बनावच उत्पादनांतला फरक लक्षात येईल. Mi बॅंड आणि स्मार्ट डिव्हाइज: तुम्ही जर शाओमीचा फिटनेस बॅंड हे प्रोडक्ट खरेदी केलं तर ते केवळ Mi Fitच्या साहाय्यानं चालणार आहे. तुम्हाला दुकानदारानं दिलेलं प्रोडक्ट बनावट असेल तर अॅपसोबत कनेक्ट करून पाहा. ते सुरू होणार नाही. बनावट फिटनेस बॅंडला कोणतंही अॅप सपोर्ट करत नाही. शाओमी पावर बॅंक: शाओमीची पावर बॅंक खरेदी करतेवेळी तुम्हाला त्याचा सिक्यॉरिटी कोड तपासून पाहावा लागणार आहे. mi.com वर जाऊन प्रोडक्टवरील सिक्यॉरिटी कोड खरा आहे की खोटा हे तपासून पाहाता येईल. Li-Polyचं चिन्ह पाहा!: ओरिजनल बॅटरीवर Li-Poly हे चिन्ह दिसेल. तर बनावट बॅटरीवर Li-ion लिहिण्यात येतं. miच्या 'लोगो'सोबत छेडछाड: कोणत्याही ब्रॅंन्डच्या नकली वस्तू बाजारात उतरवताना त्या कंपवीचा बनावट लोगो तयार करण्यात येतो. यामुळं ग्राहाकांची फसवणूक होते. त्यामुळं कंपनीकडून शाओमीचे प्रोडक्ट खरेदी करताना कपंनीच्या वेबसाइटवरून लोगो तपासून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. वाचा: शाओमी प्रोडक्टची पॅकींग: एखादं प्रोडक्ट खरेदी करताना त्याचं बॉक्स व्यवस्थित तपासून पाहा. त्याचं पॅकींग आणि त्याची गुणवत्ता दोन्ही महत्ताचं असतं. याबद्दलची सर्व माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यूएसबी केबल आणिअक्सेसरीजची गुणवत्ता: बनावट यूएसबी केबल पाहाताच क्षणी ओळखता येतात. त्यांची गुणवत्ता त्याच्या रंगावरूनही ओळखता येऊ शकते. काही प्रमाणत ते जुनाट आणि खराब झालेले असतात. ओरिजन प्रोडक्ट हे दिसायलाही फ्रेश असतात. वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YWDlJ4

Comments

clue frame