रियलमीचा X50 ५जी स्मार्टफोन जानेवारीत लाँच

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी (Realme) ने आपला पहिला एक्स५० () ७ जानेवारी २०२० रोजी लाँच करणार आहे. रियलमीने या फोनच्या लाँचच्या तारखेची घोषणा केली असून ७ जानेवारी रोजी जागतिक स्तरावर एकाच वेळी हा स्मार्टफोन लाँच करण्याचे कंपनीने ठरवले आहे. याआधी या फोनच्या संदर्भातील माहिती लीक झाली होती. यात फोनचे वैशिष्ट्ये किंमत लीक झाली होती. तर दुसरीकडे कंपनीने या फोनच्या संदर्भातील टीझर जारी केले होते. कंपनीने आतापर्यंत एक्स ५० ५ जी ची किंमत अधिकृतपणे जाहीर केली नव्हती. या फोनची किंमत फोन लाँचिंग केल्यानंतर माहिती पडणार आहे. कंपनीने आगामी स्मार्टफोन मध्ये ६.४४ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले देणार आहे. तसेच युजर्सना फोनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी स्नॅपड्रॅगन ७६५ ५जी चिपसेट मिळू शकणार आहे. तसेच या फोनमध्ये फाइव्ह डायमेंशनल आईस-कुल्ड हिट डिससिपेशन सिस्टम देण्यात येणार आहे. यामुळे हा फोन गरम होणार नाही आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६० मेगापिक्सलचा सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेन्सर, २ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमीने नुकताच एक्स२ स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. या फोनची सुरुवात किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34RfsUx

Comments

clue frame