रियलमी X2 चा उद्या पहिला सेल, १७०० ₹ सूट

नवी दिल्लीः रियलमी एक्स २ चा () उद्या (२० डिसेंबर) रोजी पहिला फ्लॅश सेल सुरू होणार आहे. उद्या दुपारी १२ वाजेपासून रियलमीची वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर हा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये रियलमी एक्स २ सोबतच कंपनीने रियलमी बड्स एअर आणि रियलमी पे एसए अॅप लाँच करणार आहे. वरून केवळ ५ मिनिटात ८ हजारांपासून ते ५ लाखांपर्यंत पर्सनल लोन मिळू शकणार आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या रियलमी एक्स २ (realme x2) ची किंमत १६ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनसोबत जिओकडून ११ हजार ५०० रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर तात्काळ १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. या नंतर फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १ वर्षाची वॉरंटी आणि अॅक्सेसरीवर ६ महिने वॉरंटी मिळणार आहे. रियलमी एक्स २ मध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०X२३४० पिक्सल आहे. फोनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ५ चा प्रोटेक्शन दिला आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम चा स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ९ पाय बेस्ड कलर ओएस ६ वर चालणारा आहे. या फोनमध्ये चार कॅमेरे दिले आहेत. पहिला ६४ मेगापिक्सलचा, दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, तिसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि चौथा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवर साठी फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ३० व्हॅट फास्ट चार्जिंगकचा सपोर्ट दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z1Udya

Comments

clue frame