हॅकिंगचा धोका, तरीही पुतिन Windows XP का वापरतात?

मॉस्को : अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला जातो. पण हॅकिंगचा आरोप होणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती सायबर सुरक्षेच्या बाबतीत कित्येत वर्षे मागे आहेत. कारण, ते आपल्या क्रेम्लिनमधील कार्यालयात अजूनही १८ वर्षे जुना विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा एक्सपी हा संगणक वापरतात. विशेष म्हणजे घरातही ते याच संगणकाचा वापर करतात. रशियातील वेबसाइट 'ओपन मीडिया'ने हा दावा केला आहे. रशियन राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून एक फोटो जारी करण्यात आलाय. त्याच आधारावर हा दावा करण्यात आला, की ते १८ वर्षे जुना विंडोज एक्सपी आधारित संगणक वापरतात. या फोटोमध्ये स्पष्ट दिसतं, की पुतिन त्यांच्या डेस्कवर बसलेले असून समोर संगणक आहे, ज्यावर क्रेम्लिनचा बॅकग्राऊंड आहे. या फोटोची पडताळणी करण्यासाठी 'ओपन मीडिया'ने रशियाची स्वतंत्र इंटरनेट संरक्षण संस्थेचे प्रमुख मिखाइल मलीमारेव्ह यांच्याशीही बातचीत केली. पुतिन यांच्या संगणकात अजूनही विंडोज एक्सपी हीच ऑपरेटिंग सिस्टम असल्याचं मलीमारेव्ह यांनीही खात्रीने सांगितलं. ही विंडोज सिस्टम मायक्रोसॉफ्टने २००१ मध्ये लाँच केली होती. पण २०१४ नंतर यासाठी सिक्युरिटी अपडेट येणं बंद झालं. इतर व्हर्जन्सपेक्षा विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टमवर व्हायरस आणि हॅकिंगचा धोका जास्त असल्याचं मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे. या धोक्यानंतरही रशियाचे राष्ट्रपती विंडोज एक्सपी का वापरतात हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे विंडोज एक्सपीनंतर आलेल्या ऑपरेटिंग सिस्टमला सीक्रेंट डिफेन्स सर्टिफिकेशन मिळालेलं नाही. दरम्यान, ही ऑपरेटिंग सिस्टम लवकरच रशियाची ऑपरेटिंग सिस्टम Astra Linux मध्ये अपग्रेड केली जाणार आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ECwSJU

Comments

clue frame