नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वांत फेव्हरेट मॅसेजिंग अॅप बनले आहेत. १० वर्षांच्या काळात व्हॉट्सअॅपमध्ये अनेक बदल झाले. वेळोवेळी अॅप अपडेट केल्याने कंपनीचे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. युजर्सना जोडून ठेवण्यासाठी अपडेट्सचा मोठा वाटा आहे. व्हॉट्सअॅप अपडेट्सबद्दल युजर्सना नोटिफिकेशन्स आणि बातम्यांमधून सर्व माहिती मिळते. पण आता आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या काही खास आणि सिक्रेट ट्रिक्सची माहिती देणार आहोत, यामुळे व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचा तुम्हाला दुप्पच आनंद घेता येईल. प्रायव्हेट मेसेजने द्या रिप्लाय ग्रुप चॅटसाठी व्हॉट्सअॅपचे हे फिचर खूप उपयुक्त आहे. ग्रुप चॅट दरम्यान एखाद्या सदस्याला स्वतंत्रपणे रिप्लाय देण्याची गरज पडते. आधी आपल्याला नंबर शोधून मेसेज पाठवावा लागत होता. पण आता प्रायव्हेट फिचर आल्याने मेसेजला रिप्लाय करणं अधिक सोपं झालं आहे. ग्रुप चॅट दरम्यान कुठल्याही सदस्याला वैयक्तीत मेसेज करायचा असल्यास त्याने पाठवलेल्या मेसेजवर किंवा त्याच्या नावावर लॉन्ग प्रेस करा आणि थेट त्याला रिप्लाय द्या. विशेष बाब म्हणजे तुम्ही प्रायव्हेट मेसेज पाठवल्याचं ग्रुपमधील इतरांना कळत नाही. कुणला पाठवतात सर्वाधिक मेसेज? तुम्ही कुणाला सर्वांत जास्त मेसेज केले? याची माहिती व्हॉट्सअॅप देतं. कुणाला जास्त मेसेज पाठवले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सेटींग मेन्यूत दिल्या गेलेल्या डेटा अँड स्टोरेज युजेस ऑप्शनवर जाऊन युजेसवर टॅप करा. इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट लिकसोबत फाइल साइजची माहिती मिळते. मोठी साइज असलेली फाइल सर्वांत वर असेल. कुणाशी तुम्ही मीडिया फाइल्स अधिक शेअर केल्या किंवा मेसेज केले ते या फाइल्सवरून स्पष्ट होतं. चॅट्सला करा पिन कॉन्टॅक्ट्सवरून ज्यांना सतत बोलावं लागतं त्यांनी चॅट्सला पिन केल्यास खूप उपयोगी ठरतं. पिन केलेले चॅट कामय टॉपवर असतं. वेगवेगळ्या कॉन्टॅक्टवरून तुम्हाला कितीही मेसेज आले तरी पिन केलेले चॅट सर्वांत वर असेल. अँड्रॉइडमध्ये चॅट पिन करण्यासाठी ते चॅट लाँग प्रेस करा. यानंतर दिलेल्या पिन ऑप्शनला टॅप करा. आयफोनच्या युजर्सनी चॅटला डावीकडून उजवीकडे स्वाइप केल्यास ते चॅट पिन करता येईल. ग्रुप चॅट इन्व्हाइट ग्रुप चॅट इन्व्हाइटची व्हॉट्सअॅप युजर्स खूप वाट पाहात होते. हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच हे फिचर सुरू केले आहे. एखाद्या ग्रुपमध्ये तुम्हाला कोण अॅड करू शकतं आणि कोण नाही हे तुम्ही ठरवू शकता. या फिचरसोबत व्हॉट्सअॅप युजर्सना 1) Everyone, 2) My Contacts, 3) My Contacts Except... असे तीन ऑप्शन दिले जातात. My Contacts निवडल्यावर तुम्हाला कुणीही कुठल्याही ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही. My Contacts Except हे सिलेक्ट केल्यास तुम्ही असे कॉन्टॅक्ट निवडू शकता ज्याद्वारे तुम्हाला कधीही कुठल्याही ग्रुपमध्ये अॅड व्हायचं नसेल. व्हॉट्सअॅप सेक्युरिटी व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतं. म्हणूनच iPhone युजर्ससाठी कंपनीने विशेष फेस आयडी किंवा टच आयडी सुरक्षा फिचर दिले आहे. व्हॉट्सअॅप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर खूप फायद्याचं आह. हे फिचर सुरू करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये दिलेल्या अकाउंट ऑप्शनवर जा. इथं प्रायव्हसी सेक्शनवर जाऊन स्क्रीन लॉकवर टॅप करा. तुमच्या व्हॉट्सअॅपवर फेस आयडी काम करेल टच आयडी हे तुमच्या आयफोनच्या मॉडेलवर अवलंबून असेल. तर अँड्रॉइड युजर्ससाठी फिंगरप्रिंट लॉकचे ऑप्शन दिले आहे. हे ही सेटिंग्जमध्ये दिलेल्या अकाउंट प्रायव्हसी ऑप्शनवर जाऊन अॅक्टिव्ह करता येईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39egflT
Comments
Post a Comment