WhatsApp मध्ये अशी लपवा तुमची 'सीक्रेट चॅट'

मुंबई : लोकप्रिय मेसेंजर WhatsApp कडून सुरक्षेच्या दृष्टीने नवनवीन फीचर्स देणं सुरूच आहे. अँड्रॉईडसाठी नुकतंच फिंगरप्रिंट लॉक फीचर देण्यात आलं, तर आयफोनलाही टच आयडी आणि फेस आयडीची सुविधा उपलब्ध आहे. आता WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटचाही पर्याय आहे. टेलिग्राम आणि हाईकमध्ये हा पर्याय अगोदरपासूनच आहे. तुम्हीही एका ठराविक चॅटला सीक्रेट ठेवू शकता, ज्याला कुणीही पाहू शकणार नाही. अँड्रॉईडवर चॅट कशी लपवाल ? तुमच्या चॅट लिस्टमध्ये तुम्हाला कोणती चॅट सीक्रेटमध्ये ठेवायची आहे, ते निश्चित करा. या चॅटवर लाँग प्रेस करा. यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला Archive पर्याय दिसेल. तीन डॉटच्या बाजूला हा पर्याय असेल. याद्वारे तुम्हाला चॅट हाईड करता येईल. iPhone वर चॅट कशी लपवाल? तुम्हाला जी चॅट हाईड करायची आहे, ती सिलेक्ट करा. यानंतर उजव्या बाजूला स्वाईप करा, यानंतर Archive पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुमची चॅट हाईड होईल. चॅट अनहाईड कशी कराल ? अँड्रॉईडमध्ये स्क्रोल डाऊन करत शेवटी या. इथे Archived हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर चॅट अनहाईड होईल. आयफोनमध्ये ही प्रक्रिया वेगळी आहे. चॅटमध्ये आल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला वरच्या बाजूला Archived Chats हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला स्वाईप करा, तुमची चॅट पुन्हा व्हॉट्सअप होम स्क्रीनवर येईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YYr86N

Comments

clue frame