Whatsapp चे हे ३ फीचर्स बदलणार चॅटिंगचा अंदाज

मुंबई : प्रसिद्ध मेसेंजर Whatsapp कडून सतत नवीन अपडेट्स देणं सुरूच असतं. कंपनीने नुकत्याच तीन अपडेट रोल आऊट केल्या आहेत. हे फीचर्स मिळाल्यानंतर चॅटिंगचा अनुभव आणखी सुंदर होणार आहे. पहिली अपडेट ही ग्रुप जोडण्यासंबंधी, दुसरी रिमाइंडर आणि तिसरी अपडेट ही कॉल वेटिंग फीचर आहे. तुम्ही Whatsapp ग्रुपला वैतागला असाल, न विचारताच तुम्हाला वारंवार ग्रुपमध्ये अॅड केलं जात असेल तर ही अपडेट तुमच्या कामाची आहे. Whatsapp ने यासाठी खास फीचर दिलं आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला कुणी अॅड करावं आणि कुणाला परवानगी नसेल याचा निर्णय आता तुम्हालाच घ्यायचा आहे. Whatsapp ने सेटिंगमध्ये यासाठी अपडेट दिली आहे. आतापर्यंत तुम्हाला ग्रुपमध्ये कुणाकडूनही अॅड केलं जाऊ शकत होतं. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर अकाऊंट, नंतर प्रायव्हसी आणि ग्रुप्समध्ये जावं लागेल. इथे तुम्हाला Who can add me to groups हा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्ही Everyone, my contacts आणि my contacts except यापैकी एक पर्याय निवडू शकता. WhatsApp रिमाइंडर फीचर एका थर्ड पार्टी App च्या माध्यमातून युझर्सना व्हॉट्सअपवरही आता Reminder मिळतील. रिमाइंडर लावण्यासाठी युझरला मोबाईलमध्ये any.do हे App डाऊनलोड करावं लागेल. या App च्या माध्यमातून तुम्ही सेट केलेल्या वेळेनुसार रिमाइंडर मिळतील. टेक वेबसाईट Android Police च्या माध्यमातून any.do ने व्हॉट्सअपसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या फीचरमुळे युझर्सची अनेक कामं सोपी होणार आहेत. कुणाला फोन करणं, खरेदी करणं यांसारख्या अनेक गोष्टींची आठवण राहण्यासाठी हे फीचर मदत करणार आहे. तुम्ही हे रिमाइंडर कोणत्याही युझरला फॉरवर्डही करू शकता. तुम्ही App मध्ये कोणतीही टास्क तयार केल्यानंतर तुम्हाला रिमाइंडरची विचारणा केली जाईल. रिमाइंडर सेट केल्यानंतर ठरलेल्या वेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. फीचरचा वापर कसा कराल ? फीचर सक्रिय करण्यासाठी तुम्ही Any.do चा वापर करू शकता. किंवा whatsapp.any.do या लिंकलाही भेट देता येईल. App च्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला Integrations हा पर्याय निवडावा लागेल. इथे WhatsApp वर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि अकाऊंट लिंक करा. फोनवर ६ अंकी कोड येईल, जो टाकल्यानंतर रिमाइंडर सक्रिय करावं लागेल. दरम्यान, या फीचरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना Any.do चं प्रीमिअम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. कॉल वेटिंग फीचर या फोनमुळे Whatsapp कॉलचा वापर करणाऱ्या ग्राहकांना जास्त फायदा होणार आहे. तुम्ही फोनवर बोलत असाल आणि कुणी तुम्हाला फोन करत असेल, तर व्हॉट्सअप कॉल वेटिंग नॉटिफिकेशन देईल. त्यामुळे तुम्हाला फोन घेण्याचा किंवा कट करण्याचा पर्याय मिळेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PUAJXY

Comments

clue frame