नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपल्या गीगाफायबर ग्राहकांसाठी नवीन डेटा व्हाऊचर्स आणले आहे. जिओ गीगाफायबरच्या डेटा व्हाऊचर्सची किंमत १०१ रुपयांपासून सुरू होणार आहे. हा डेटा व्हाऊचर्स एक डेटा टॉप अप प्रमाणे आहे. याचा वापर अतिरिक्त डेटासाठी केला जाऊ शकतो. ज्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या डेटा प्लानची मर्यादा संपली असेल अशावेळी त्याचा फायदा मिळू शकतो. जिओ फायबर डेटा व्हाऊचर्सची किंमत १०१ रुपयांपासून सुरू होणार आहे. तर ४००१ रुपयांपर्यंत याची किंमत आहे. यात २००० जीबी किंवा २ टीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मिळणार आहे. या नवीन डेटा व्हाऊचर्सची वैधता जिओ फायबर प्लानच्या वैधतेपर्यंत असणार आहे. जिओ फायबरच्या पेड गिऱ्हाईकांसाठी माय जिओ अॅप किंवा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन डेटा व्हाऊचर्स रिचार्ज करता येऊ शकते. टेलिकॉम टॉक रिपोर्टच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने आपल्या पेड जिओ फायबर ग्राहकांसाठी एकूण ६ डेटा व्हाऊचर्स आणले आहेत. याची किंमत १०१ रुपये, २५१ रुपये, १००१ रुपये, २००१ रुपये आणि ४००१ रुपये असणार आहे. १०१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये २५ जीबी डेटा, २५१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये ५५ जीबी डेटा आणि ५०१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये १२५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच १००१ रुपयांच्या डेटा व्हाउचर्समध्ये २७५ जीबी डेटा, २००१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये ६५० जीबी डेटा आणि ४००१ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्समध्ये २००० जीबी डेटा मिळणार आहे. जर ६९९ रुपयांचा जिओ फायबर प्लान घेतला असेल तर ३० डिसेंबर रोजी त्याची वैधता संपणार आहे. अशावेळी डेटा व्हाऊचर्समधून कोणत्याही किंमतीचा रिचार्ज केला तर ग्राहकांना डेटाचा फायदा मिळेल. परंतु, प्लानची वैधता ३० डिसेंबर ही असणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35uAZnb
Comments
Post a Comment