विवोचा 'सेल्फी' किंग S1 Pro जानेवारीत लाँच होणार

नवी दिल्लीः विवोचा स्मार्टफोन एस १ प्रो () भारतात पुढील महिन्यात लाँच होणार आहे. या आधी विवोने एस१ आणि एस१ प्रो आकर्षक डिझाइनसह चीन आणि फिलिपिन्सच्या बाजारात आणले होते. कंपनी आता एस१ हा स्मार्टफोन भारतात नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीत लाँच करणार आहे. या फोनमध्ये दमदार डिस्प्ले, प्रोसेसर आणि अँड्रॉयड ९.० पायचा सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सेल्फीसाठी खास ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत फिलिपिन्समध्ये १५,९९९ पीएचपी म्हणजे भारतात जवळपास २२ हजार ६०० रुपये किंमत असणार आहे. तर दुसरीकडे हा फोन प्रीमियम प्राइस टॅगसह हा फोन भारतीय बाजारात उतरवण्यात येणार आहे. ग्राहकांना या फोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर सह आठ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड ९.० पाय आणि फनटच ओएस ९.२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो आहे. या फोनमध्ये पाठीमागे क्वॉड कॅमेराचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा जीएम१ सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आहे. खास काढता यावी यासाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ४,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी १८ व्होल्टची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2rfbirM

Comments

clue frame