नवी दिल्लीः शाओमीचे मोबाइल घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनवर ' रेडमी नोट ८ प्रो'चा आजपासून सेल सुरू होत असून, दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया आणि 'एमआय डॉट कॉम'वर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. चीनी स्मार्ट फोन बनवणाऱ्या शाओमीने अल्पावधीतच भारतीय बाजारात आपला दबदबा निर्माण केला. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा 'रेडमी नोट ८ प्रो' लॉन्च करण्यात आला होता. ६४ आणि ४ रिअर कॅमेऱ्यांच्या वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करण्यात आला. अॅमेझॉनवर सुरू होणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना एक हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. या ग्राहकांना मिळेल सूट 'रेडमी नोट ८ प्रो' मोबाइलवर अॅमेझॉन इंडियाकडून ग्राहकांना 'नो-कॉस्ट ईएमआय'ची ऑफर देण्यात आली असून, आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तर, शाओमीचे अधिकृत संकेतस्थळ असणाऱ्या वर या मोबाइलच्या खरेदीवर ग्राहकांसाठी एक हजार रुपयांच्या डिस्काउंटसह ९९९ रुपयांची Mi Protect सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा लाभही ग्राहक घेऊ शकतात. ची किंमत 'शाओडी ' तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाइलची किंमत १४,९९९ रुपये असून, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाइलची किंमत १५,९९९ रुये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणारा मोबाइल १७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय हा मोबाइल तीन आकर्षक रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन एमआययूआय १० या ओएसवर काम करतो. ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलियो प्रोसेसरवर हा मोबाइल चालतो. ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइट लेंस, २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि २ मेगापिक्सल मायक्रो लेंस कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या मोबाइलची बॅटरी ४,५०० mAh असून, फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34tv40h
Comments
Post a Comment