Realme दोन नवीन स्मार्टफोन आणणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी (Realme) नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच करणार आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. 5G वरील हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल. याशिवाय कंपनी आणखी दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचं सांगण्यात येतंय. रियलमी C3 () आणि रियलमी 5i () असे दोन नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणणार आहे. रियलमी C2 आणि रियलमी 3i चे नवीन व्हर्जन रियलमी C3 हा रियलमी C2 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. तर रियलमी 5i हा स्मार्टफोन रियलमी 3i चे नवे व्हर्जन असणार आहे. रियलमी C2 आणि रियलमी 3i हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहे. त्यांचे येणारे नवीन व्हर्जनही भारतात लाँच केले जाणार आहेत. पण ते कधी करणार याची माहिती कंपनीने दिलेली नाही. रियलमी 5 सीरीजमधील चौथा स्मार्टस्फोन असेल रियलमी 5i रियलमी 5i हा सीरीजमधला चौथा स्मार्टस्फोन असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाची FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन देण्यात आलीय. Realme 5 Pro ला पाठिमागे चार कॅमेरे देण्यात आलेत. या 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा दिला गेलाय. या शिवाय 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स, 2 मेगापिक्सलचा पोट्रेट लेन्स और 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मायक्रो लेन्सचा कॅमेरा दिला गेलाय. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला गेलाय. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 712 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 4,035 mAh इतकी बॅटरी दिली गेलीय. या सीरीजमधल्या रियलमी 5s च्या फिचर्सचा विचार केल्यास फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉल्युशन सोबत 6.5 इंचचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. गोरिला ग्लास 3 प्रटेक्शनसोबत हा फोन येतो. यात 4जीबी रॅम आणि 665 एसओसी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. रियलमी 5s मध्ये 128 जीबी की इंटरनल स्टोरेज आणि गरज पडल्यास ग्राहक माइक्रो एसडी कार्डच्या सहायाने 256जीबी पर्यंत वाढवू शकतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MjRWJo

Comments

clue frame