राजापूर ( रत्नागिरी ) - पश्चिम घाटातील तिलारी ( जि. कोल्हापूर ) परिसरातील कातळावर नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. "क्लोरोफायटम तिलारीएन्स एस. आर. यादव ऍन्ड चांदोरे" असे त्याचे नाव आहे. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव आणि रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरूण चांदोरे यांनी सात वर्षाच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा शोध लावला.
संशोधित फुलवनस्पती सफेद मुसळीच्या प्रजातीमधील आहे.
सफेद मुसळीच्या जगामध्ये सुमारे दीडशे प्रजाती आहेत. त्यामध्ये भारतामधून आतापार्यंत सुमारे 23 प्रजातींची नोंद झालेली आहे. तिलारी भागामध्ये या वनस्पतीचा शोध लागल्याने या नव्या फुलवनस्पतीला" क्लोरोफायटम तिलारीएन्स' असे नाव देण्यात आले आहे.
हेही वाचा - कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी यांनी घेतला पुढाकार
सफेद रंगाचे फुल असलेली वनस्पती
या नव्या संशोधनाबद्दल डॉ. यादव आणि डॉ. चांदोरे यांचे अभिनंदन केले जात आहे. मराठे महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना प्रा. डॉ. चांदोरे यांनी गेल्या काही वर्षामध्ये अनेक नव्या फुलवनस्पतींचा शोध लावला आहे. त्यामध्ये पश्चिम घाट परिसरामध्ये नव्याने संशोधित केलेल्या फुलवनस्पतीची भर पडली आहे. पश्चिम घाट परिसरामध्ये फिरत असताना डॉ. चांदोरे यांच्या नजरेला सफेद रंगाचे फुल असलेली ही वनस्पती पडली. त्याबद्दल त्यांना कुतूहूल निर्माण होवून त्यांनी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तिची नोंद आढळली नाही.
नवीन फुलवनस्पती म्हणून नोंद
त्यानंतर, त्यांनी गेली सात वर्ष डॉ. यादव यांच्या मार्गदशनाखाली या फुलवनस्पतीचा सखोल अभ्यास करून संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाची दखल घेवून न्युझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने "क्लोरोफायटम तिलारीएन्स' या नावाची नवीन फुलवनस्पती म्हणून नोंद काल (ता.30) प्रकाशित केले. या संशोधनामध्ये त्यांना आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, संशोधक विद्यार्थी नीलेश माधव, देवीदास बोरूडे, प्रा.डॉ. कुमार विनोद गोसावी यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा - चिपळूण शिवसेना मरगळ कधी झटकणार
फुल वनस्पतीची वैशिष्ट्ये
- वनस्पतीची उंची - 1 फुटापर्यंत
- पाने - 22 सेंटीमीटरपर्यंत लांब
- फुलांची लांबी - सुमारे 2.8 सेंटीमीटर
- फुले व फळे कालावधी - जुलै ते ऑगस्ट
- कंदमुळे -10 ते 15 व 5 ते 14 सेंटीमीटर लांब
- एकदल वर्गातील वनस्पती
- जास्त उंचीच्या कातळावर आढळ
दृष्टिक्षेपात..
- तिलारीतील कातळावर आढळ
- डॉ. यादव, डॉ. अरुण चांदोरेंचे यश
- सफेद मुसळीच्या प्रजातीमधील
- न्युझीलंडमधील नियतकालीकात नोंद

from News Story Feeds https://ift.tt/2u0aGr0
Comments
Post a Comment