Oppo Reno 3 सीरीज आज होणार लाँच

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) आज देशातील बाजारात बहुप्रतीक्षित अशी (Oppo Reno 3) सिरीज लाँच करणार आहे. 'ओप्पो रेनॉ 3' सोबत कंपनी ओप्पो रेनॉ 3 प्रो () ही लाँच करणार आहे. आणि प्रो व्हेरियंट हे ड्युल बँड 5G कनेक्टीव्हिटीसोबत येणार आहेत. या सिरीजमध्ये क्वॉड कॅम सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. Oppo Reno 3 सिरीज २६ डिसेंबरला लाँच करणार असल्याचं ओप्पोने काही दिवसांपूर्वीच सोशल साइट Weibo जाहीर केलंय. Reno 3 आणि Oppo Reno 3 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं होतं. Oppo Reno 3 Pro मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 765G प्रोसेसरसोबत लाँच केला जाणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ColorOS 7 स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स दिला जाणार आहे. लाँचच्या आधीच चीनमध्ये हे स्मार्टफोन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. फोनच्या मागे ४ कॅमेरे Oppo Reno 3 Pro स्मार्टफोनमध्ये स्नँपड्रॅगन 765G प्रोसेसर सोबत 12 जीबीपर्यंत रॅम यूजर्सला मिळेल. यात मागच्या बाजूला 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर कॅमेरा असेल. तर बाकीचे तीन कॅमेरे 13 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे असतील. वायरलेस इअर बड्स होणार लाँच Oppo Reno 3 सीरीजसोबत कंपनी Oppo Enco Free True वायरलेस इअरबड्सही लाँच करणार आहे. हे वायरलेस इअरबड्स काळ्या, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे असतील. यांचे डिजाइन Huawei FreeBuds 2 सारखे दिसतेय. पण याचे अधिक फिचर्स समोर आलेले नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/377NTaZ

Comments

clue frame