नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी () आपला नोट १० सीरिजचा Mi स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार आहे. कंपनीने याआधी हा स्मार्टफोन स्पेनमध्ये लाँच केलेला आहे. शाओमी नवीन वर्षात हा फोन भारतात लाँच करणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर, एचडी डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसरचा सपोर्ट देणार आहे. भारतात कोणत्या तारखेला हा फोन करणार आहे, याविषयी शाओमीने अद्याप अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. Mi Note 10 Pro या फोनची किंमत भारतात जवळपास ५० हजार ते ५५ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. याआधी शाओमीने ८ जीबी रॅम फोन स्पेनच्या बाजारात उतरवला होता. त्याची किंमत ६४९ यूरो म्हणजेच ५१ हजार रुपये किंमत होती. स्पेनमध्ये या फोनचा सेल सुद्धा सुरू आहे. तर हा फोन ग्राहकांना ग्लेशियक व्हाइट, ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या रंगात मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनी या फोनमध्ये ६.४७ इंचाचा कर्व्ड फुल एचडी डिस्प्ले देणार आहे. ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० चीपसेट आहे. हा फोन अँड्रॉयड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टम वर काम करीत आहे. या फोनमध्ये पेंटा कॅमेराचा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २० मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, १२ मेगापिक्सलचा शॉर्ट टेलिफोटो लेन्स, पाच मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि दोन मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. जबरदस्त सेल्फी काढता यावा यासाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनमध्ये ४जी व्होल्ट, जीपीएस, वायफाय, ब्लूटूथ ५.० ३.४ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये ५, २६० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ३० डब्ल्यू फास्ट चार्जिंग फिचर देण्यात आले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PTI0Zq
Comments
Post a Comment