रियलमीचा ६४MP नंतर १०८ मेगापिक्सलचा फोन

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी () ने भारतीय बाजारपेठेत आपले बस्तान चांगलेच बसवले आहे. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित चौथ्या नंबरवर असलेली रियलमी कंपनीने याआधी ४८ मेगापिक्सल, ६४ मेगापिक्सलचा स्मार्टफोन बाजारात आणला होता. आता कंपनी लवकरच १०८ मेगापिक्सलचा स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे. द मोबाइल इंडियनच्या एका रिपोर्टनुसार, कंपनी आता १०८ मेगापिक्सलचा फोन बाजारात उतरवणार आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी या वृत्ताल दुजोरा दिल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कंपनीने याआधी ४८ मेगापिक्सल आणि ६४ मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केलेला आहे. कंपनीने नुकताच भारतात रियलमी एक्स २ स्मार्टफोन लाँच केला होता. रियलमी एक्स२ हा पर्ल ग्रीन, पर्ल ब्लू आणि पर्ल व्हाईट या तीन रंगात उपलब्ध केला होता. रियलमी एक्स २ स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला आणि बॅकला गोरिला ग्लास ५ देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सीमसह मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. यामुळे फोनचे स्टोरेज २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकता येते. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात सेल्फी नाइटस्केप मोड सुद्धा देण्यात आला आहे. फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेराचा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या पाठीमागे ४ कॅमेरे देण्यात आले आहे. मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. फोनच्या मागे ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. शाओमीचा जगातील पहिला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. एमआय नोट १० या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. परंतु, हा फोन सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. १०८ मेगापिक्सल सेन्सर सह यात ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १२ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. सॅमसंगच्या आगामी Galaxy S11 या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो, असे सांगितले जात आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ScG7Zo

Comments

clue frame