सॅमसंग गॅलेक्सी M31ची वैशिष्ट्ये ऑनलाइन लीक

नवी दिल्लीः आपल्या एम सीरिज अंतर्गत आणखी एक नवीन आणण्याच्या तयारीत आहे. असं या आगामी फोनचं नाव असून या फोनचे खास वैशिष्ट्ये ऑनलाइन लीक झाली आहेत. सॅमसंगचा हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम असणार आहे. बेंचमार्क लिस्टिंगने खुलासा केला आहे की, हा स्मार्टफोन अँड्रॉयड १०, मल्टी-कोर असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम३१ स्मार्टफोन कंपनीच्या इन हाउस Exynos 9611 वर चालणार आहे. आधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसरवर चालणार आहे. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप असणार आहे. स्मार्टफोनच्या पाठीमागे ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असणार आहे. हा कंपनीचा एम सीरिजचा नवीन फोन असणार आहे. याआधी कंपनीने एम सीरिज अंतर्गत गॅलेक्सी एम३० आणि गॅलेक्सी एम३० एस हे दोन फोन बाजारात उतरवले होते. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन्स ११,४९९ रुपये, आणि १३ हजार ९९९ रुपयात मिळत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम३०एस मध्ये ६००० एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस एअमोलेटेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Exynos 9611 प्रोसेसरवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत बिल्ट इन स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनच्या बॅकमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MuaR4m

Comments

clue frame