Google ने खास डुडलद्वारे दिल्या नाताळच्या शुभेच्छ

नवी दिल्लीः सण, उत्सवाला Google कायम स्पेशल डूडलद्वारे सर्वांना शुभेच्छा देतं. आता नाताळ सुरू होत असल्याने गुगलने या आठवड्यात डूडलची खास मालिकाच आणलीय. आजही गुगलने एक खास अतिशय सुंदर असे एनिमेटेड डूडल बनवलं आहे. हे बघून आपल्याला नाताळ आल्याची अनुभूती होते. या डूडलसोबत गुगलने '' असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल डूडलमध्ये काय आहे खास? आज डूडलमध्ये Google च्या एका 'O'ला पृथ्वीचं स्वरुप दिलं आहे. हे अनिमेशन सतत फिरतं आणि बघायला अतिशय छान वाटतं. यात एक नाताळाचं झाडही दाखवण्यात आलंय. ज्याच्या चारही दिशांना सांताक्लॉजची गाडी फिरताना दिसतेय. तसंच सतत हिमवृष्टी होतानाही दिसतेय. काय आहे हॉलिडे सीजन? अमेरिकेत हॉलिडे सीजन हा थँक्सगिविंपासून ते नववर्षापर्यंत चालतो. याला 'ख्रिसमस सीजन' असंही म्हटलं जातं. यादरम्यान ख्रिसमस, हनुका आणि क्वॉन्जा असे फेस्टिव्हलही होतात. हा हॉलिडेज सीजन डिसेंबर अखेरपासून ते जानेवारीपर्यंत सुरू राहतो. सर्वांत छोट्या दिवसासाठी बनवले होते स्पेशल डूडल २२ डिसेंबर हा सर्वांत छोटा दिवस होता. यानिमित्ताने गुगने एक खास डूडल बनवले होते. या दिवसाला विंटर सोल्सटिसही म्हटलं जातं. या डूडलमध्ये गुगल एक छानसा स्नोमॅन (बर्फाचा पुतळा) दाखवला होता.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34Qt1DP

Comments

clue frame