Flipkart: ६२ हजारांचा सॅमसंग S9 २७ हजारांत!

नवी दिल्लीः ऑनलाइन खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी इयर एंड सेल आणला आहे. २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत सुरू राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सच्या खरेदीवर दणदणीत सूट देण्यात येत आहे. ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने एक छोटाशा टीझर प्रसिद्ध करून स्मार्टफोन्सवरील धमाकेदार ऑफर्सविषयी माहिती दिली आहे. हा सेल २०१९ वर्षातील सर्वाधिक बेस्ट ऑफर सेल आहे, असा दावा फ्लिपकार्टकडून करण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेचे वापरून या सेलमध्ये खरेदी केल्यास १० टक्क्यांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. ही सूट ईएमआय व्यवहारांवरही उपलब्ध असेल. ''मधील बेस्ट डील्सबद्दल जाणून घेऊया... सॅमसंग स्मार्टफोन्सवर भरघोस सूट सॅमसंग S9 या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिअंट २७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या मोबाइलची किंमत ६२,५०० आहे. तर, ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेला सॅमसंग S9+ हा स्मार्टफोन २९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. १८,९०० रुपये किंमतीचा सॅमसंग A30S १५,९९९ रुपये, २१ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग A50 १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ओप्पोच्या स्मार्टफोन्सवरही सूट मध्ये ओप्पो F11 प्रो १६,९९९ रुपये किंमतील मिळेल. याची किंमत २९,९९० इतकी आहे. तर, १८,९९० रुपयांचा ओप्पो A7 ९,९९० रुपये आणि २१,९९० रुपयांचा ओप्पो F11 १२,९९० रुपयांत खरेदी करता येईल. फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर बंपर सूट फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत देण्यात येणार आहे. गुगल पिक्सल 3a XL ३०,९९९ रुपयांत, आयफोन 7 २४,९९९ रुपयांत, सॅमसंग A70S स्मार्टफोन २८,९९९ रुपयांमध्ये आणि गुगल पिक्सल 3 ४२,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. यांची अनुक्रमे किंमत ४४,९९९ रुपये, २९,९९९ रुपये, २८,९९९ रुपये आणि ७१ हजार रुपये आहे. याशिवाय सेलमध्ये आयफोन 11 मालिकेतील स्मार्टफोन्स ६४,९०० रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध असेल. ऑनर स्मार्टफोन्सवर बेस्ट ऑफर्स फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये १३,९९९ रुपयांचा ऑनर १० लाइट ७,९९९ रुपयांत, १६,९९९ रुपयांचा ऑनर 20 आय १०,९९९ रुपयांत आणि १९,९९९ रुपयांचा ऑनर 9 एन ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. याशिवाय १४,९९९ किंमतीचा ऑनर 8 सी ७,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. नोकिया, आसुस स्मार्टफोन्सवरही सूट या इयर एंड सेलमध्ये नोकिया व आसुसच्या स्मार्टफोन्सवरही सूट देण्यात आली आहे. नोकिया 7.2 हा स्मार्टफोन १६,५९९ रुपये, नोकिया 6.1 प्लस ८,९९९ रुपये आणि नोकिया 2.2 ५,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. तर, आसुस मॅक्स एम1 हा स्मार्टफोन ५,९९९ रुपये, मॅक्स प्रो एम1 ७,९९९ रुपये आणि आसुस 5झेड १५,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. याशिवाय, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या बजेट स्मार्टफोन्सवरही सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या टॅबलेट्सवर सूट असेल. विविध प्रकारच्या सूटसह 'नो कॉस्ट ईएमआय' आणि 'एक्सचेंज' ऑफर देण्यात येणार आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M9GBM6

Comments

clue frame