BSNLची ऑफर; 'या' प्लानवर रोज ३ जीबी डेटा

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनलने आपल्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये सुधारणा केलीय. या प्लानचे नाव असं आहे. आधी या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळत होता. आता कंपनीने त्यात वाढ केलीय. एक्स्ट्रा डेटा ऑफरनुसार ३१ डिसेंबरपर्यंत ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा देणार आहे. पण ३१ डिसेंबरनंतर हा पुन्हा २जीबी रोज डेटा दिला जाईल. ६६६ रुपये प्लानची सुविधा २३ डिसेंबर म्हणजे उद्यापासून सुरू होईल. बीएसएनएलने दुसऱ्यांदा या प्लानमध्ये बदल केलाय. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणाची घोषणा सरकारने केलीय. यानंतर बीएसएनएलने ६६६ रुपयांच्या या प्लानमध्ये थोडा बदल केला. यात एमटीएनएलच्या नंबरवर मोफत कॉलिंग सुविधा देण्यास सुरुवात केलीय. कसा आहे BSNL चा ६६६ रुपयांचा प्लास BSNL च्या ६६६ रुपयांचा हा प्लान १३४ दिवसांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (२५० मिनिट रोज लिमिट) आणि ३१ डिसेंबरपर्यंत ३जीबी डेटा रोज दिला जातोय. तर १ जानेवारीपासून २ जीबी डेटा दिला जाईल. याशिवाय १०० एसएमएस रोज मिळतील. या प्लानमध्ये आतापर्यंत ४ वेळा बदल करण्यात आलाय. २०१९च्या सुरुवातीला १२९ दिवसांचा हा प्लान कमी करून १२२ दिवसांचा केला गेला. काही महिन्यानंतर प्लानची वैधता १३४ दिवसांवर केली गेली. यानंतर काही दिवसांपूर्वी वप मोफत व्हाइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली. आणि आता चौथ्यांना डेटामध्ये बदल केला गेलाय.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2tCRuiR

Comments

clue frame