रेडमी नोट ७ प्रोवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत

नवी दिल्लीः २०१९ हे वर्ष संपण्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या काही दिवसानंतर नवं वर्ष सुरू होणार आहे. वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात शाओमीनं रेडमी नोट ७ प्रोचा सेल सुरू केला असून त्यावर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. शाओमीचा नंबर वन एमआय फॅन सेल हा सेल १९ डिसेंबरपासून सुरू झाला असून तो २५ डिसेंबर रोजी संपणार आहे. हा सेल , , आणि कंपनीच्या ऑफलाइन स्टोअर्स वर सुरू आहे. या सेलमध्ये शाओमीच्या स्मार्टफोन्सवर, टीव्हीवर, आणि अन्य उत्पादनावर मोठी सूट दिली जात आहे. या सेलचे वैशिष्ट्ये म्हणजे कंपनीचा सुप्रसिद्ध मोबाइल वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनवर ६ हजार रुपयांची सरळ सूट दिली जात आहे. तसेच १ हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. तसेच फोनमध्ये नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सूटनंतर हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन ९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात Sony IMX586 सेन्सर दिला आहे. तसेच रियर कॅमेऱ्यात ५ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ब्युटी इफेक्ट सह १३ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा फोनला ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये ४,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीच्या या सेलमध्ये Redmi K20 Pro वर ४ हजारापर्यंत डिस्काउंट, Poco F1 वर १२ हजारांपर्यंत डिस्काउंट, Redmi Y3 वर ४ हजारांपर्यंत डिस्काउंट Redmi Go वर १७०० वर डिस्काउंट तर Redmi 7 वर ३ हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35S3P0X

Comments

clue frame