ग्राहकांचा जिओकडे ओढा कायम; ९१ लाख नवे ग्राहक

नवी दिल्ली: रिलायन्स जिओकडे ग्राहकांचा ओढा कायम असल्याचे समोर आले आहे. जिओने प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलला पछाडत ऑक्टोबर २०१९ मध्ये एकूण ९१ लाख नवीन लाख नवीन ग्राहक जोडले. ऑक्टोबरमध्ये जिओने आययूसीचे दर लागू करत दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास प्रतिमिनिट सहा पैसे शुल्क आकारणी सुरू केली होती. जिओने आययूसीतंर्गत दर लागू केल्यानंतर जिओच्या ग्राहक संख्येवर काही विशेष फरक पडला नाही. ट्रायच्या रिपोर्टनुसार, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाच्या ग्राहक संख्येत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये वोडाफोन-आयडियाने १.९ लाख आणि एअरटेलने ऑक्टोबर अखेरपर्यंत जवळपास ८१ हजार ९७४ नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. एकूण ग्राहक संख्येचा विचार करता ऑक्टोबर २०१९ मध्ये जिओची ग्राहक संख्या ३६.४३ कोटी झाली आहे. तर, एअरटेलजवळ ३२.५६ कोटी ग्राहक असून वोडाफोन-आयडियाजवळ एकूण ३७.२७ कोटी ग्राहक आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ऑक्टोबर महिन्यात २.८ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. बाजारपेठेतील हिस्सेदारीत जिओ दुसऱ्या स्थानी वोडाफोन-आयडियाचे टेलिकॉम बाजारपेठेवर वर्चस्व आहे. वोडाफोन-आयडियाकडे सध्या ३१.४९ टक्के मार्केट शेअर आहे. तर, दुसऱ्या स्थानी आहे. एअरटेलचा मार्केट शेअर ऑक्टोबर २०१९ मध्ये २७.५२ टक्के इतका आहे. बीएसएनएल-एमटीएनएलचा मार्केट शेअर १०.२० टक्के आहे. ट्रायच्या अहवालानुसार, भारतात ऑक्टोबर महिन्यात ११८.४ कोटी मोबाइल ग्राहक होते. तर, हीच संख्या सप्टेंबरमध्ये ११७.३७ कोटी होती.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MIQtMO

Comments

clue frame