नवी दिल्लीः सोशल मीडियात नंबर वन असलेल्या फेसबुकला आता टिकटॉकने मागे टाकले आहे. २०१९ या वर्षी डाउनलोड करणाऱ्यांची संख्या ११ टक्क्यांनी कमी झाल्याने पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. डाउनलोड करण्यात आलेल्या १० अॅप्सपैकी सात अॅप्स हे सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन्स संबंधी अॅप्स आहेत. फेसबुक यावर्षी डाउनलोड करण्यात मागे पडले असले तरी गेल्या दशक भरापासून सोशल मीडियात सर्वाधिक डाउनलोड झालेल्यांच्या यादीत फेसबुक अद्यापही अव्वल स्थानी अबाधित आहे. मोबाइल मार्केटिंग डाटा कंपनीकडून करण्यात आलेल्या ताज्या रॅकिंगच्या माहितीनुसार, डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये व्हॉट्सअॅपचा तिसरा क्रमांक आहे. फेसबुकने २०१४ साली व्हॉट्सअॅपला १९०० कोटी अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी केले होते. अॅप अॅनीने २०१० ते १०१९ या दरम्यान डाउनलोड करण्यात आलेल्या अॅप्सच्या डाटाची माहिती दिली आहे. यानुसार, २०१९ मध्ये फेसबुक डाउनलोड करणाऱ्यांची संख्या ११ टक्के कमी झाली आहे. त्यामुळे टिकटॉक नंबर वन वर पोहोचले आहे. गेल्या वर्षभरात जगभरात टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. गेल्या दहा वर्षात फेसबुकचे ४६० कोटी, फेसबुक मेसेंजरचे ४४० कोटी, व्हॉट्सअॅपचे ४३० कोटी, इन्स्टाग्रामचे २७० कोटी, स्नॅपचॅटचे १५० कोटी, स्काईपचे १३० कोटी, टिकटॉकचे १३० कोटी, यूसी ब्राउजरचे १३० कोटी, यूट्यूबचे १३० कोटी, ट्विटरचे १०० कोटी अॅप युजर आहेत. नेटफ्लिक्स, टिंडर, पेंडोरा म्युझिक, टेनसेंट व्हिडिओ, आयक्युयी, स्पॉटीफाय, यूट्यूब, एचबीओ नाऊ, क्वाई, या अॅपला लोकांनी मनोरंजन म्हणून पसंती दिली आहे. सब वे सर्फर, कँडीक्रॅश, टेंपल रन २, माय टॉकिंग टॉम, क्लॅश ऑफ क्लांस, पोऊ, हिल क्लाइंब रेसिंग, मिनियन रश, फ्रूट निंजा, ८ बॉल पूल, यासारख्या अॅप्सला छोट्या मुलांनी पसंती दिली आहे. हे सर्व खेळ लहान मुलांची खेळ म्हणून पाहिले जातात. यात जास्त डोके लावण्याची गरज नाही. २०१९ मध्ये १२ हजार कोटी अॅप इंस्टॉल करण्यात आले आहेत. २०१८ वर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2F1155x
Comments
Post a Comment