शाओमीचा वायरलेस कीबोर्ड-माउस, किंमत फक्त...

नवी दिल्ली : शाओमीने वायरलेस कीबोर्ड आणि माउस सेट लाँच केला आहे. या सेटचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही ड्रायव्हरची गरज नसेल. या वायरलेस कीबोर्डचं डिझाईन अत्यंत स्लिम आणि कमी वजनाचं आहे. कीबोर्ड आणि माउस २.४GHz वायरलेस कनेक्शन, पॉवर सेव्हिंग स्लीप टेक्नोलॉजीला सपोर्टेड आहे. या दोन वस्तूंमुळे कार्यालयीन कामकाज करणाऱ्या युझर्सला मोठा फायदा होणार आहे. किंमत आणि वैशिष्ट्य कीबोर्ड आणि माउस सेटची किंमत ९९ युआन म्हणजे जवळपास एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही प्रोडक्ट सध्या चीनमध्येच लाँच करण्यात आले आहेत. कीबोर्डमध्ये १०४ फुल साईज की-लेआऊटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फंक्शन कीज, कीपॅड्स आणि Arrow की यांचा फुल सेट आहे. याशिवाय Fn की देखील देण्यात आली आहे. Fn + F1- ~ F12 कॉम्बिनेशन कीज व्हॉल्यूम, मीडिया, म्यूट आणि सॉन्ग कट असे शॉर्टकटही फंक्शनही सपोर्टेड आहेत. कीबोर्डला वरच्या उजव्या कोपऱ्यात चार इंडिकेटर्स देण्यात आले आहेत, जे की कॅप्स लॉक, नंबर लॉक आणि पॉवर इंडिकेटर आहेत. माउसमध्ये १००० डीपीआय ऑप्टिकल सेन्सर कीबोर्डमध्ये खालच्या बाजूला ६ डिग्री नॅच्युरल इनक्लाईन डिझाईन आहे, ज्यामुळे हा कीबोर्ड वापरासाठी आणखी सुलभ होतो. शिवाय जास्त वेळ काम करतानाही थकवा जाणवत नाही. कीबोर्डप्रमाणेच माउसही अत्यंत कमी वजनाचा आहे. या माउसचं वजन केवळ ६० ग्रॅम आहे. शाओमीच्या माउसमध्ये १००० डीपीआय ऑप्टिकल सेन्सर देण्यात आले आहेत. या माउसला ट्रिपल ए बॅटरी असून रिसीव्हर खालच्या बाजूला आहे. शाओमीने नुकताच चीनमध्ये एमआय AI टचस्क्रीन स्पीकर प्रो ८ लाँच केला आहे. यामध्ये ८ इंच आकाराचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर स्पीकर खालच्या बाजूला देण्यात आले आहेत. पॉवर आणि व्हॉल्यूम कंट्रोल बटण डिस्प्लेच्या उजव्या बाजूच्या मागे आहेत. तर कॅमेरा स्क्रीनच्या वर आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34Mt4Ai

Comments

clue frame