नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलनं बनवलं खास डुडल

नवी दिल्लीः नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात जोरदार तयारी सुरू आहे.अवघ्या काही तासांनंतर नवीन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलनं एक खास बनवलं आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी जगभरात उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुगलनंही थर्टी फर्स्ट जरा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. गुगलने नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक खास डुडल बनवले आहे. गुगलच्या डुडलमध्ये हवामानाचा अंदाज दर्शवणारा एक बेडूक दाखवण्यात आला आहे. तो आतषबाजीकडे पाहत आहे. त्याच्याजवळ एक चिमणी बसलेली दिसत आहे. तिने आनंद साजरा करणारी टोपी घातली आहे. मोबाइलवर हवामान गुगल सर्च करणाऱ्या व्यक्तींसाठी हे बेडूक नक्कीच परिचीत असणारं आहे. गुगल डुडलमध्ये जी आतषबाजी दाखवण्यात आली आहे. ती वेगवेगळ्या पाच रंगात म्हणजेच, निळी, लाल, पिवळी, गुलाबी आणि हिरव्या रंगात आहे. या आधी गुगलने २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस दिना निमित्त एक खास डूडल तयार केले होते. त्या अॅनिमेडेट डुडलला क्लिक करण्याआधी हॅप्पी हॉलिडे्ज दिसत होते. डुडलमध्ये दोन खुर्च्यावर सांता बसलेले दिसत होते. तसेच गुगलच्या एल अक्षराच्या जागेवर ख्रिसमस ट्री दाखवण्यात आला होता.



from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2snQIWZ

Comments

clue frame