मुंबई: सध्याच्या काळात ई-मेलद्वारे होणारा संवाद महत्त्वाचा आहे. ऑफिसचे कामकाज, वैयक्तिक गोष्टी, बँक व्यवहार आदी बाबींसाठी ई-मेल महत्त्वाचे आहे. मात्र, त्याच वेळी युजर्सचा मेल इनबॉक्स अनावश्यक ई-मेलनी भरून जातो. परिणामी या अनावश्यक मेलच्या गर्दीत काही वेळेस महत्त्वाच्या ई-मेलकडे दुर्लक्ष होते. त्याशिवाय ई-मेलचा वापर युजर्सचा डेटा चोरी करण्यासाठीदेखील वापरला जात असल्याचे प्रकारही उघडीकस आले आहेत. अनेकदा अशा प्रकारचे मेल स्पॅममध्ये मुव्ह करूनदेखील त्यांचा त्रास कमी होत नाही. मात्र, या अनावश्यक स्पॅम मेलपासून सुटका करता येणे शक्य आहे. तुम्ही या तीन प्रकारे स्पॅम मेलपासून सुटका करून घेऊ शकता. पहिली पद्धत: मेल पाठवणाऱ्याला ब्लॉक करा - तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये लॉगिन करा - ज्या मेल पाठवणाऱ्याला ब्लॉक करायचे आहे, त्याचा मेल उघडा - मेलवर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा - ब्लॉक पर्यायावर क्लिक करा दुसरी पद्धत: फिल्टरचा वापर करा - जीमेल लॉगिन केल्यानंतर ड्रॉप डाउन बटणावर टॅप करा - 'To' च्या ओळीत मेल पाठवणाऱ्याचे नाव किंवा ई-मेल आयडी टाइप करा आणि फिल्टर पर्यायावर क्लिक करा - त्यानंतर 'डिलीट इट' पर्यायावर क्लिक करा तिसरी पद्धत: की वर्डचा वापर करा - यासाठी सर्च फिल्टरमध्ये जाऊन की वर्ड टाइप करा आणि ज्यांना आपल्याला ब्लॉक करायचे आहे. ते की वर्ड (उदाहरणार्थ- Promotions, Sale, Discounts, offers ) टाइप करा. त्यानंतर Has the Word सेक्शनमध्ये जाऊन क्रिएट फिल्टरवर क्लिक करा आणि 'डिलीट इट' या पर्यायावर टॅप करा.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34U2ohj
Comments
Post a Comment