अधिक डेटा हवा असल्यास 'हे' प्लान बेस्ट!

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या नव्या टॅरिफ प्लानसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आणि व्होडाफोन-आयडिया आपल्या योजनांद्वारे ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देत आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स देखील आपले प्लान तुलनेने किंचित स्वस्तच देत आहेत. मात्र, जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळताना दिसत नाहीए. शिवाय विविध कंपन्यांच्या विविध प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाचा विचार करता कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसत आहे. जर तुम्ही दिवसभर डेटा वापरत असाल, किंवा तुम्हाला दिवसभर अधिक डेटा वापरण्याची आवश्यकता असेल तर कोणते प्लान अधिक डेटा उपलब्ध करून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे जिओचा ३ जीबी जिओ एका रिचार्ज प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा देते. रिलायन्स जिओची हा प्लान ३४९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच, आपण जिओची ही योजना रीचार्ज केल्यास तुम्हाला एकूण ८४GB डेटा मिळेल. या व्यतिरिक्त कोणत्याही योजनेत जिओवर मोफत कॉल करण्याचा फायदा या योजनेत उपलब्ध आहे. तसेच, योजनेमध्ये १००० नॉन-लाइव्ह एफओपी मिनिटे देखील उपलब्ध आहेत. या द्वारे तुम्ही इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. या योजनेत दररोज १०० एसएमएस पाठविण्याच्या सोयीसह जिओ अॅप्सचे एक कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिप्शन मिळणार आहे. एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान एअरटेलकडेही दररोज ३ जीबी डेटा देणारा प्लान उपलब्ध आहे. एअरटेलची हा प्लान ३९८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना एकूण ८४GB डेटा मिळतो. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानचे एक वैशिष्ट्य म्हणजे, या प्लानद्वारे वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लानमध्ये, वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉल करू शकतात. या प्लानमध्ये आपण दररोज १०० एसएमएस पाठवू शकता. या शिवाय ग्राहकाला एअरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅपचे प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मिळते. व्होडाफोनचे २९९ आणि ४४९ रुपयांचे प्लानव्होडाफोनकडे दररोज 3 जीबी डेटा देणारा कोणताही प्लान नाही. कंपनी आपल्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा देत आहे. जर अधिक डेटा देणाऱ्या प्लानबाबत बोलायचे झाल्यास आपल्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा देत आहे आणि या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तथापि, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा एक फायदा ग्राहकांना मिळत आहे. व्होडाफोनच्या ४४९ रुपयांच्या प्लानमध्येही वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34ZsvDk

Comments

clue frame