niraj.pandit@timesgroup.com व्हॉट्सअॅपवर या वर्षांत तब्बल ७० कोटींहून अधिक व्हिडीओ आणि मेसेजेस मराठीतून तयार झालेत. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलं आहे. यात भारतीय भाषांमधून जास्त मेसेजेस शेअर झाले आहेत, असं एका पाहणीतून समोर आलं आहे. सुरु असलेल्या ट्रेंडवर भाष्य करणाऱ्या किंवा मजेशीर घटनांवर कोट्या करणाऱ्या अनेक पोस्ट दररोज प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात. आधी हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर असलेल्या पोस्ट आपल्यापर्यंत यायच्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये मराठीतल्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. मग ते विनोदीशैलीत हाणलेला टोला असो वा एखाद्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केलेली पोस्ट असो, ते चवचवीनं वाचलं जातं आणि लगेच फॉरवर्डही केलं जातं. या सगळ्यात मराठीचा बोलबोला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर भारतीय भाषांमधून मेसेजेस, व्हिडीओ आणि ग्राफिक व्हायरल होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यात अर्थात हिंदी आघाडीवर असलं तरी मराठी भाषाही मागे नाही. २०१९ या वर्षात दरदिवशी सुमारे ७० कोटींहून अधिक मेसेजेस मराठीतून व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. यात व्हिडीओ, मेसेजेस आणि फोटोंचा समावेश आहे. यंदा व्हिडीओ आणि फोटो शुभेच्छांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर तयार होणाऱ्या मेसेजेसपैकी १७ टक्के मेसेजेस हे विविध सणांच्या शुभेच्छांचे होते. तर १३ टक्के मेसेजेस हे ‘स्टेटर आणि स्टोरीज’ आणि १८ टक्के मेसेजेस हे ‘रोमान्स’चे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी मेसेज तयार करण्यामध्ये पुरुष आघाडीवर असून या वर्षांत ६९ टक्के मेसेजेस आणि व्हिडीओची निर्मिती पुरुषांनी केलेली होती तर यात महिलांचं प्रमाण ३१ टक्के इतकं होतं, अशी माहिती शेअरचॅटने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. बहुतांश पुरुष युजर्स हे मेसेजेस तयार करण्यासाठी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंतचा वेळ वापरतात तर महिला युजर्स रात्री ८ ते १० या वेळात सर्वाधिक नवे मेसेजेस तयार करतात. तर सर्वाधिक मसेजेस शेअर होण्याचं प्रमाण हे सकाळी ८ ते १० या वेळेत असल्याचं या पाहणीत समोर आलं आहे. व्हिडीओजमध्ये वाढ नव्यानं व्हिडीओ तयार करणाऱ्यांची संख्या वाढली असून मराठी युजर्सनी व्हिडीओसाठी तब्बल एक कोटी ९० तास सोशल मीडियावर खर्च केले असून ५० लाख लोकांनी व्हिडीओ तयार केले आहेत. तर दरदिवशी ७० कोटी शेअर होत होते. तर दिवसाला ६६० तासांचे व्हिडीओ अपलोड होत असल्याचंही या पाहणीत समोर आलं आहे. राज्यात सर्वाधिक शेअर झालेल्या मेसेजेसचे विषय - आगामी मुख्यमंत्री कोण? - पुलवामा हल्ला - आषाढी एकादशी - अयोध्या निर्णय - सांगली पूरग्रस्तांसाठी प्रार्थना
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2sel2D5
Comments
Post a Comment