पुणे : तुम्ही स्वतःची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती सध्याच्या काळात इलेक्ट्रिकच खरेदी करायला हवी. इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचे अनेक चांगले फायदे आहेत. दिल्ली सारख्या ठिकाणी तर इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. दिल्लीसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. अशात पेट्रोल बाईक खरेदी करणे हे आणखीनच घातक आहे. त्यामुळे नवीन बाईक घेण्याचा विचार करत असल्यास ती इलेक्ट्रिक बाईकच असावी याकडे आपला कटाक्ष असायला हवा. इलेक्ट्रिक बाईक घेतल्यास आपल्याला फायदा होण्याची पाच कारणे :
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
१) कमी खर्च (Low running cost) : इंधनदरवाढीच्या काळात इलेक्ट्रिक बाईक ही अत्यंत कमी खर्चात रस्त्यावर धावते. ईलिक्ट्रिक बाईक ही साधारणपणे एकावेळी चार्ज करण्यासाठी तीन युनिट एवढी वीज खाते. एका वेळी चार्ज केलेली गाडी ही १५० किमी धावते. म्हणजे एका युनिटला दहा रुपये खर्च पकडला तरी इलेक्ट्रिक बाईक तीस रुपयांच्या खर्चात १५० किमी धावणार म्हणजेच प्रति किमी ५० पैशापेक्षा कमी प्रवासखर्च होईल.
नेहरु कुटुंबियावर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला जामीन मंजूर
२) प्रदुषणमुक्त (Zero emissions & environment) : इलेक्ट्रिक बाईक ही प्रदुषणमुक्त आहे. बाईक प्रदुषणमुक्त असल्याने पर्यावरणाची हानी होणार नाही. विषारी उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, विशेषत: हानिकारक कार्बन आणि नायट्रस ऑक्साईडसारखे वायू हवेत मिसळणार नाहीत. यामुळे पेट्रोल बाईकमुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान थांबेल.
लगते थे बुझाने वाले आग; वही लगा रहे है आग
३) कमी त्रासदायक (Convenience) : ईलेक्ट्रिक बाईक आपण कधीही, कोठेही चार्ज करू शकता, त्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही. इलेक्ट्रिक वाहनासह, आपल्याला कधीही पेट्रोलपंपावर जाण्याची गरज नाही. आपण बाईकची बॅटरली आपल्या कार्यालयात किंवा निवासस्थानावर चार्ज करू शकता. तुम्हाला पेट्रोलपंपावर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार १८ जणांचा शपथविधी
४) कमी देखभाल (Low Maintenance): ईलेक्ट्रिक बाईकला जास्त देखभाल करण्याची गरज नाही. पेट्रोल बाईकसाठी पाच-सहा वर्षात जेवढे पेट्रोलसाठी पैसे लागतात. तेवढ्या किंमतीत ईलेक्ट्रिक बाईक खरेदी करता येते. ईलेक्ट्रिक बाईक ५० पैसे प्रति किमी पेक्षा कमी खर्चात रस्त्यावर धावते. तसेच मेंटेनंससाठीचा खर्चही अत्यंत कमी आहे. पेट्रोल बाईला साधारणतः २००० पार्ट असतात. पण ईलेक्ट्रिक बाईकमध्ये केवळ २०-२५ पार्ट असतात. त्यामुळे मेटेनंस खर्च हा अत्यंत कमी असतो.
५) कर बचत (Tax benefits): केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कमी केला आहे. परिणामी वाहनांच्या किमती कमी होणार आहेत.

from News Story Feeds https://ift.tt/36GP7dc
Comments
Post a Comment