फक्त एक मेसेज व्हॉट्सअॅप क्रॅश करू शकतो

नवी दिल्ली: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांना बरेच नवीन फीचर्स मिळत आहेत. याबरोबरच नव्या नव्या फिचर्समधील असलेल्या कमतरताही स्पष्ट होत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपमधील एक आश्चर्यकारक त्रुटी समोर आली आहे. ती म्हणजे तुम्ही जर एकच मेसेज पाठवला, तर अॅप क्रॅश करू शकतात. हा बग इतका गंभीर आहे की त्याच्या मदतीने अ‍ॅप क्रॅश झाल्यास ते अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे लागणार आहे. एक मेसेज एकाचवेळी अनेक मजकूर एकाच वेळी अनेक क्रॅश करू शकतो असे सेक्युरिची फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या त्रुटीचा परिणाम अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ मानतात. कारण व्हॉट्सअॅप हा बर्‍याच लोकांसाठी संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे. संशोधकांच्या मते या बगद्वारे हल्ला करून अॅप क्रॅश होऊ शकतो, त्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन कामांवर होऊ शकतो. ग्रुपचॅटमधूनही होऊ शकतो हल्ला व्हॉट्सअॅप हा जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप आहे. याचे १५० कोटींहूनही जास्त वापरकर्ते आणि १० दशलक्षाहूनही अधिक गट सक्रिय आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने दररोज सुमारे ६५ अब्ज मेसेज पाठविले जातात. अशात हे बग बर्‍याच वापरकर्त्यांवर परिणाम करू शकतात. तसेच, ग्रुप चॅटमध्ये एकाचवेळी मेसेज पाठवून बर्‍याच वापरकर्त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. यानंतर, ग्रुप उघडताच ग्रुप मेंबरचे अ‍ॅप क्रॅश होऊ शकतो. जोपर्यंत वापरकर्ता आपले अॅप अनइनस्टॉल करत नाही, तो पर्यंत हे अॅप वारंवार क्रॅश होत राहते. व्हाट्सएप अपडेट करा अ‍ॅप पुन्हा इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांना पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये चॅट करू शकत नाहीत. किंवा त्याना चॅट हिस्ट्री पाहणेही अशक्य असते. या बगची माहिती रिसर्चपॉईंट वरून व्हॉट्सअॅप टीमला देण्यात आली होती. व्हॉट्सअॅपनेही हे बग फिक्स केले आहेत. आता वापरकर्त्यांना त्यांचे अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जर आपण व्हॉट्सअ‍ॅपचे नवे व्हर्जन अपडेट केले असेल तर असा हल्ला होण्याची शक्यता नसते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M5ztAg

Comments

clue frame