नवी दिल्लीः युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार कंपनीने टॅरिफ प्रोटेक्शन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हिसमुळं युजर्सना टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतरही युजर्सना जुने प्लान्स मिळत होते. मात्र, आता ही सर्व्हिस बंद झाल्यानं युजर्सना नवीन प्लान्सनं रिचार्ज करावा लागणार आहे. रिलायन्स जिओनं ६ डिसेंबरला टॅरिफ प्लान्स जाहीर केले होते. टॅरिफ प्लानचे दर वाढल्यानंतर जिओनं ऑफ नेट ( दुसऱ्या नेटवर्क) व्हॉइस मिनिट्स प्लानची सुरुवात १२९ रुपयांपासून सुरू होते तर, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियानं १४९ रुपयांपासून सुरु होतात. ज्या युजर्सकडे कोणताही अॅक्टिव्ह प्लान नाहीये अशा युजर्ससाठी जिओनं टॅरिफ प्रटेक्शन प्लानची योजना आणली होती. युजर्सच्या स्मार्टफोनवर आधीपासूनच कोणता प्लान अॅक्टिव्ह असेल तर ते या प्लानचा उपयोग करू शकत नाही. मात्र, आता नॉन-अॅक्टिव्ह युजर्ससाठीसुद्धा ही सर्व्हिस बंद झाली आहे. सर्व युजर्सना आता रिचार्ज करावा लागणार टॅरिफ प्रोटेक्शन प्लान बंद झाल्यानंतर नॉन-अॅक्टिव्ह युजर्सना जिओ टेलिकॉम सर्व्हिस घेण्यासाठी रिचार्ज करावा लागणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओचे नवीन प्रीपेड प्लानची सुरुवात ९८ रुपयांपासून सुरू होतात. जिओच्या सब्सक्रायबर्समध्ये घट जिओच्या आययूसी सेवेमुळं अनेक जिओ युजर्स नाराज आहेत. तसंच, टॅरिफ प्रोटेक्शन प्लान बंद झाल्यानंतर जिओच्या युजर्समध्ये घट होण्याची शक्यता आहे. या सेवेमुळं एअरटेल, वोडाफोन, आयडियाला याचा फायदा होणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एअरटेलनं १ कोटी २० लाख नवे युजर्स मिळवले होते. तर, मागच्या महिन्यात एअरटेलनं जवळपास १५ लाख युजर्स जोडले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SIwaTV
Comments
Post a Comment