म्हणजे नवा आशा, नव्या आकांक्षा, नवी स्वप्न, नवे संकल्प, नव्या ओळखी, नवी भरारी मारण्याचे वर्ष. अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा घेऊन नव्या वर्षाचा सूर्योदय होत असतो. नव्या वर्षांत आनंद वाटायचा असतो. दुःख, निराशा विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी नववर्षानिमित्ताने आपल्याला मिळत असते. या नव्या वर्षाची सुरुवात उत्तमोत्तम संदेश पाठवून आपण करू शकतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी-भेटी होत नसल्या, तरी मित्रांना, नातेवाइकांना, आप्तेष्टांना नववर्ष स्वागताचे संदेश पाठवून त्यांच्याबद्दलच्या आठवणींना नक्कीच उजाळा देऊ शकतो. चला तर मग, नववर्ष २०२० निमित्त आपल्या खास मित्रांना आपल्या खास शैलित शुभेच्छा देऊयात.... या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…! चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवुया, नववर्षाभिनंदन.. सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करूया, नवीन वर्षात नवे संकल्प करूया, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो. आगामी नवीन वर्षांत आपले जीवन आनंदमयी आणि समृद्ध होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. पुन्हा एक नवं वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या आयुष्याला मिळो पुन्हा एक नवी दिशा नवी स्वप्न, नवी क्षितिजं सोबत माझ्या शुभेच्छा.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.. नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. नव्या या वर्षी संस्कृती आपली जपुया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. इतर दिवसांसारखाच असतो हाही दिवस तसाच उगवतो अन् तसाच मावळतो तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो आशेच्या नव्या किरणांचा नजराणा त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी अन् सोनेरी स्वप्नांची झळाळी म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस तो असतो नव्या वर्षाचा आरंभ नव्या स्वप्नांचा प्रारंभ धरून मनी हीच इच्छा नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा.. नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36gIKxp
Comments
Post a Comment