मुंबई: वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी चार नवे प्लान आणले आहेत. या प्लान्सची किंमत अवघ्या ३९ रुपयांपासून सुरू होते. अ र्थात हे प्लान ठराविक क्षेत्रांसाठीच लागू आहेत. याव्यतिरिकत्य १२९ रु. १९९ रु. आणि २६९ रु.चे प्लानही आहेत, जे केवळ आंध्र प्रदेश, मुंबई, ओडिशा आणि उत्तर प्रदेशच्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहेत. लवकरच हे सर्व क्षेत्रांमध्ये लागू होतील. काय आहेत १२९ रु., १९९ रु. आणि २६९ रु.चे प्लान? १२९ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएसव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देत आहे. या प्लानची वैधता १४ दिवस आहे. तसं पाहिलं तर हा प्लान १४९ रुपयांच्या प्लानप्रमाणेच आहे. मात्र १४९ रु. च्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. अशा वेळी १४९ रुपयांचा प्लान ग्राहकांना अधिक फायदेशीर आहे. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. याव्यतिरिक्त प्रतिदिन १०० एसएमएस आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडिटी २१ दिवसांची आहे. या प्लानच्या सुविधा पाहता तो २१९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे, मात्र याची व्हॅलिडिटी २१९ रुपयांच्या प्लानपेक्षा ७ दिवस कमी आहे. यात सर्वात मोठा २६९ रुपयांचा प्लान त्या वोडाफोन युजर्ससाठी आहे, ज्यांना जास्त दिवसांची व्हॅलिडिटी हवी आहे. या प्लानमध्ये यूजर्सना ६०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगव्यतिरिक्त ४ जीबी डेटा मिळेल. या प्लान ची वैधता ५६ दिवसांची आहे. ३९ रुपयांचा प्लान काय आहे? वोडाफोनचा ३९ रुपयांचा ऑलराउंडर प्लान आला आहे. हा ठराविक ग्राहकांपुरताच मर्यादित आहे. यात फुल टॉक टाइमसह १०० एमबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36WcIqw
Comments
Post a Comment