मुंबई: येत्या २६ डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या या वर्षातील अखेरचे असून ते केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित भारतातून खंडग्रास दिसणार आहे. ग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता वाजता होईल तर भारतातून ८.१० वाजता होईल. ग्रहण समाप्ती ११.१० वाजता होणार आहे. यानंतर २१ जून २०२० रोजी पुन्हा आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणाच्यावेळी पृथ्वी व चंद्राचे अंतर कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते. कंकणाकृती ग्रहणाच्यावेळी चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर जास्त असते. सूर्यबिंब मोठे आणि चंद्रबिंब लहान असते. चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. वाचा: ग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया, ओमान, भारत, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातून दिसेल. दक्षिण भारतात केरळ मधील (कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड), कर्नाटकातील (मंगलोर, म्हैसूर,), तामिळनाडूतील (कोईमतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई) येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून ६० ते ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८.१० वाजेपासून दिसेल. ९.३२ वाजता ग्रहण मध्य, ११ वाजता ग्रहण समाप्ती होईल. सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळे खराब किंवा अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्यासाठी ग्रहण चष्मे, काळे वेल्डींग ग्लास किंवा अगदी काळी सुरक्षित एक्स रे फिल्म यांचा उपयोग करावा. साध्या आरशाच्या काचेने भिंतीवर सूर्यबिंब पाडून ग्रहण पाहावे. वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2tKAHuk
Comments
Post a Comment