नवी दिल्लीः जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात नव्या ऑफर्स द्यायचे ठरवलेले दिसत आहे. नवीन वर्ष २०२० मध्ये रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ' ' आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना वर्षभर अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. २०२० रुपयांचा पेमेंट केल्यानंतर या ऑफर अंतर्गत वर्षभरासाठी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, दररोज १.५ जीबीचा फोर जी डेटा, १०० एसएमएस आणि अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. जिओच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना वर्षभर म्हणजे बरोबर ३६५ दिवस ही सेवा मिळणार आहे. जिओने सर्वात आधी टॅरिफ दर वाढवल्याने जिओचे ग्राहक कंपनीवर प्रंचड नाराज झाले होते. जिओच्या या दरवाढी नंतर इतर व्होडाफोन, एअरटेल, आयडिया या कंपन्यांनी दरवाढ केली होती. या निर्णयामुळे इंटरनेट सेवा व कॉलिंग सेवा महाग झाली आहे. आधीच्या तुलनेत सध्या मोबाइल सेवा महाग झाली आहे. परंतु, जिओने नवीन वर्षात ग्राहकांची नाराजी दूर करण्यासाठी तसेच त्यांना थोडा दिलासा देण्यासाठी नवीन ऑफर्स आणली आहे. जर ग्राहकांनी जिओ फोन खरेदी केल्यास कंपनीकडून या ग्राहकांना आणखी ऑफर्स देण्यात येणार आहे. २०२० रुयपांत ग्राहकांना एक नवीन जिओफोन दिला जाणार आहे. तसेच १२ महिन्यांपर्यंत अनलिमिटेड सेवा दिली जाणार आहे. जिओफोन ग्राहकांना अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगसह दररोज ०.५ जीबी डेटा आणि एसएमएस सेवा दिली जाणार आहे. जिओची ही ऑफर मर्यादीत आहे. २४ डिसेंबर पासून ग्राहकांना याचे फायदे मिळू शकतील. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये नॉन जिओ नंबर्सवर अनिलिमिटेड कॉलिंग सब्सक्राइबर्स मिळणार नाही. रिलायन्स जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. परंतु, इतर नेटर्कवर कॉलिंग करण्यासाठी एफयूपी लिमिट देण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZgYhKY
Comments
Post a Comment