२०१९मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले 'हे' व्हिडिओ

मुंबई: सरत्या वर्षात देशात अनेक घडामोडी घडल्या. त्या सर्व गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर देखील झाली. सोशल मीडियावर कोणाची खिल्ली उडवली गेली तर याच सोशल मीडियामुळं अनेकजण सुपरस्टार झाले. त्यात टिकटॉक अॅपची देखील भर पडली. अनेक व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पाहूयात २०१९मध्ये व्हायरल झालेले व्हिडिओ. रानू मंडल गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातील 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन रानू मंडल एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली. पॅराग्लायडिंग काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बांदा इथं राहणाऱ्या विपिन साहू नावाच्या तरुणाचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. माकडानं जिंकली मनं माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तहानेनं व्याकूळ झालेलं एक माकड नळावर पाणी पित आहे. विशेष म्हणजे पाणी पिऊन झाल्यानंतर या माकडानं चक्क नळ बंद केला. जवानांचा गरबा डान्स नवरात्रोत्सव संपल्यानंतर सीमेवर लढणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी जवान गरब्याच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडीओ Twitter शेअर केला होता. विश्वास नांगरे पाटलांचा 'बाला डान्स' व्हायरल नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला. औरंगाबादला आपल्या भाचीच्या लग्नात मामानं असा काही डान्स केला की तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2rMIYxq

Comments

clue frame