कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

मुंबई: दक्षिण भारतातील काही भागांतून गुरुवारी (२६ डिसेंबर) कंकणाकृती दिसणार आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार, गडद सावली पृथ्वीवर पडते. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खग्रास किंवा बघायला मिळते. म्हणजे सूर्य अमावस्येच्या चंद्रामागे काही काळ लपलेला दिसून येतो. सर्वसाधारणपणे पृथ्वीवरून पाहताना चंद्र आणि सुर्याचा आकाशातील व्यास एकसारखाच म्हणजे अर्धा अंश असतो. मात्र, चंद्र पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेतून फिरताना काही वेळा त्याचे पृथ्वीपासून कमी, तर काही वेळा जास्त असते. त्यामुळे चंद्राच्या आकाशात दिसणाऱ्या व्यासामध्येही फरक पडतो. पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरताना सूर्यापासून कमी किंवा जास्त अंतरावर असते. त्यामुळे आकाशात सूर्याच्या दिसणाऱ्या व्यासातही फरक पडतो. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात, एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून जवळच्या अंतरावर असेल तर त्याचा आकार सूर्याच्या आकाराएवढा किंवा त्यापेक्षा जास्त असतो. अशा वेळेस चंद्र सूर्याला काही काळ आपल्यामागे पूर्णपणे झाकतो, या घटनेला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. काही वेळा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात, एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार सूर्यापेक्षा कमी राहतो. अशा वेळेस सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळेस चंद्र सूर्यासमोर आलेला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूंनी झळाळताना दिसतो. तेजस्वी बांगडीसारख्या दिसणाऱ्या या घटनेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. अमावस्येचा गोलाकार चंद्र त्याच्यापेक्षा आकाराने मोठ्या असणाऱ्या सूर्यासमोरून सरकतानाचे हे नयनरम्य दृश्य काही मिनिटे दिसते. मात्र, ते पाहण्यासाठी चंद्राच्या गडद सावलीच्या मार्गावर जावे लागते. दीड तासांची कंकणाकृती अवस्था शहर सुरुवात मध्य शेवट चंद्र सुर्याला किती ग्रासेल (टक्क्यांमध्ये) मेंगळुरू (कर्नाटक) ०८:०४:२४ ०९:२५:१५ ११:०३:३६ ९३.०४ उटी (तमिळनाडू) ०८:०५:५३ ०९:२८:४१ ११:०९:४३ ९३.१७ करैकुडी (तमिळनाडू) ०८:०७:५० ०९:३२:५७ ११:१७:०० ९३.३०


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Spo4zm

Comments

clue frame